सावधान ! वीज बिलाचा चेक बाउन्स झाल्यास आता होईल असे काही…

MHLive24 टीम, 7 ऑगस्ट 2021 :-  राज्यातील सुमारे ४ लाख ५१ हजार वीज ग्राहक दरमहा वीज बिलांचा भरणा धनादेशाद्वारे करतात. यापैकी सुमारे १० हजार ५०० ग्राहकांचे धनादेश अनादरित (बाउन्स) होत आहेत. अशा प्रत्येक ग्राहकाकडून ८८५ रुपये अतिरिक्त रक्कम पुढील बिलात वसूल करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.

यात वीज बिलासाठी अतिरिक्त ७५० रुपये, बँक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस, त्यावरील १८ टक्के व्याज व जीएसटीचे १३५ रुपये अशी ही रक्कम असेल. हे टाळण्यासाठी ग्राहकांनी धनादेशाऐवजी वीज बिलांचा ऑनलाइन भरणा करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी केले आहे.

अनादरित झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीज बिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीज बिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहे. तसेच अशा ग्राहकांना धनादेशाद्वारे वीज बिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे.

Advertisement

चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात संबंधित रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरित होत असतात. धनादेश दिल्यानंतर तो क्लिअर होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो.

बिल भरण्याची पावती त्याच दिवशीची मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच वीज बिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीज बिलामध्ये थकबाकी तशीच राहते. त्यामुळे अनेकांची अडचण होत असल्याचेही समोर आले आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker