Share Market tips : सध्या शेअर मार्केटमध्ये भरपूर अस्थिरता आहे. बहुतांश वेळी गुंतवणूकदारांना मार्केटचा कल समजून घेण्यात अपयश येते. जर मार्केटमध्ये तुम्हाला टिकून राहायचे असेल तर गुंतवणूकदारांनी योग्य स्टॉकची निवड करणे खूप गरजेचे आहे.

कर्जबाजारी दूरसंचार कंपनी Vodafone Idea Limited च्या शेअर्समध्ये मोठी घसरण होऊ शकते. सप्टेंबर 2022 च्या तिमाही निकालानंतर, जागतिक ब्रोकरेज गोल्डमन सॅक्सने टेलिकॉम कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. यासह, त्यांच्याकडून लक्ष्य किंमत 2.60 रुपयांवरून 2.50 रुपये प्रति शेअर करण्यात आली आहे. खरं तर, व्होडा आयडियाचा निव्वळ तोटा दुसऱ्या तिमाहीत 7,595.5 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. शुक्रवारी (4 नोव्हेंबर, 2022) BSE वर शेअर 2.80% ने घसरून 8.33 रुपयांवर आला.

व्होडा-आयडियाचा तोटा ४.१% वाढला

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत VIL चा एकात्मिक निव्वळ तोटा वाढून रु. 7,595.5 कोटी झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 7,132.3 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

उत्पन्न वाढले

तथापि, Vodafone Idea ने महसूल, EBITDA, ARPU आणि 4G ग्राहक आधार यासारख्या इतर प्रमुख मेट्रिक्समध्ये वाढ दर्शविली आहे. 2022-23 च्या दुसऱ्या तिमाहीत व्होडा-आयडियाच्या सेवांद्वारे उत्पन्न 12.8% वाढून 10,614.6 कोटी रुपये झाले. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 9,406.4 कोटी रुपये होते.

4G ग्राहकांची संख्या वाढली

कंपनीचा वापरकर्त्यांना सरासरी महसूल (ARPU) वर्षभरात 19.5% ने वाढून 131 रुपये झाला आहे. गेल्या तिमाहीत टेलिकॉम कंपनीच्या ग्राहकांची संख्या 23.44 कोटींवर घसरली आहे. वर्षभरापूर्वी याच काळात ते 24 कोटी होते. तथापि, कंपनीच्या 4G सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 1.5 दशलक्षने वाढून 120 दशलक्ष झाली आहे.

शेअर्स ७०% तुटू शकतात

गोल्डमन सॅक्सने व्होडाफोन आयडियाचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने स्टॉकची लक्ष्य किंमत 2.60 रुपयांवरून 2.50 रुपये केली. आज बीएसईवर 2.10 टक्क्यांच्या घसरणीसह शेअर 8.39 रुपयांवर व्यवहार करत आहे. या किमतीसह, भविष्यात स्टॉक 70 टक्क्यांहून अधिक घसरू शकतो.