Business idea : प्रत्येक व्यक्तीस आपले अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज असते. यासाठी अनेकजण आपल्या परीने कष्ट करत असतात. आज आम्ही तुमच्या कष्टाला पंख देतील अशी एक कल्पना घेऊन आलो आहोत.

वास्तविक आता देशात परदेशी भाज्या, फळांची मागणी वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आता पारंपरिक शेती सोडून नवीन पिके घेत आहेत. यापैकी काही फळे अशीही आहेत जी मूळची भारतातील नाहीत, परंतु त्यांना खूप मागणी आहे. असेच एक फळ म्हणजे किविशा किवी हे फळ मूळचे चीनचे आहे. त्याला चायनीज गुसबेरी असेही म्हणतात. भारतातही किवीचे उत्पादन वाढू लागले आहे. नागालँडमध्ये सर्वाधिक किवीची बागायती केली जाते. यासाठी केंद्र सरकारने नागालँडला किवी राज्याचा दर्जा मिळावा यासाठी मदत करण्यास सुरुवात केली आहे.

तथापि, ईशान्येकडील इतर राज्यांत किवीचे पीक भरपूर आहे. पण नागालँडच्या तुलनेत ते अजूनही खूप मागे आहेत. एक हेक्टर बागेतून २४ लाखांचे उत्पन्न मिळू शकते, असे व्यावसायिक सांगतात. दुसरीकडे, एक हेक्टरमध्ये सफरचंदाची बाग लावून केवळ 8.9 लाखांचे उत्पन्न मिळू शकते. तर भाजीपाला विशेषतः टोमॅटो उत्पादनातून केवळ 2 ते 2.5 लाखांचे उत्पन्न मिळू शकते.

जास्त तापमान असलेल्या भागात किवीची लागवड करता येत नाही. जिथे बहुतांशी थंड हवामान असते, तिथे या फळाची लागवड होते. जेथे तापमान साधारणपणे ३० अंशांच्या वर जात नाही तेथे किवीची लागवड करता येते. देशातील डोंगराळ आणि थंड हवामान असलेल्या राज्यात शेतकरी त्याची लागवड करत आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, अन्न प्रक्रिया मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणतात की नागालँड आणि इतर ईशान्येकडील राज्ये किवीसारख्या विदेशी फळांच्या उत्पादनात चांगली भूमिका बजावत आहेत. किवी उत्पादनामुळे येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याबरोबरच फळबागांचे क्षेत्रही विस्तारले आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. नागालँडला ‘किवी राज्य’ चा दर्जा मिळायला हवा, असे ते म्हणाले. या दिशेने काम करण्याची गरज आहे.

किवीचे फायदे

किवीमध्ये संत्र्यापेक्षा 5 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. त्यात 20 पेक्षा जास्त पोषक असतात. व्हिटॅमिन आणि पोटॅशियम, तांबे, फायबर देखील किवी फळामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. म्हणूनच याला सुपरफ्रूट असेही म्हणतात. 70 ग्रॅम ताज्या किवी फळांमध्ये व्हिटॅमिन सी 50% व्हिटॅमिन के 1%, कॅल्शियम 10%, फायबर 8%, व्हिटॅमिन ई 60%, पोटॅशियम 6% आढळते. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडेंट शरीराला आजारांपासून वाचवण्याचे काम करते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते.