MHLive24 टीम, 06 फेब्रुवारी 2022 :- सध्या बाजारात लाल कांद्याची आवक वाढली असली तरी कांदा निर्यातीबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्ट धोरण ठरविले जात नाही. त्यामुळॆ बाजारात कांद्याचे भाव कोसळू लागले आहेत. याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.(Onion prices)

सोलापूर बाजार समितीत तेराशेहून अधिक ट्रकची आवक झाली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंधन घातलेले आहे त्यामळे अंतर्गत कांद्याचा साठा वाढू लागला आहे.

महाराष्ट्राच्या लाल कांद्याला आखाती देशातून जास्ती मागणी आहे मात्र सरकारच्या बंधनात कांदा महाराष्ट्रातच अडकणार त्यामुळे कांद्याला भाव मिळण्याचे चान्सेस कमी झालेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याचे 25 ते 30 टक्के अधिक उत्पादन झाले आहे

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांनी 25 ते 30 टक्के अधिक उन्हाळ कांद्याचे उत्पादन घेतले. उन्हाळ्यात पिकवलेला कांदा पुणे आणि नाशिक येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात तयार करतात.

डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नवीन कांदा पिकाचे नुकसान झाले होते. यानंतर कांद्याचे पीक चांगले आले. त्यामुळे बाजारात नवीन कांद्याची आवक झपाट्याने वाढली. सध्या बाजारात कांद्याची मुबलक आवक आहे.

महाराष्ट्रातील शेतकरी भारतात सर्वाधिक कांदा पिकवतात आणि नाशिकजवळील लासलगाव येथे कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कांदा उत्पादक शेतकरी गेल्या अनेक महिन्यांपासून अडचणीत आहेत. अवकाळी पावसामुळे कांदा सडला.

कांद्याचा तुटवडा भागवण्यासाठी काही वेळा कांदा आयात करावा लागतो. मग बाजारात कांद्याची उपलब्धता न झाल्याने शेतकऱ्यांच्या तयार पिकाला योग्य भाव मिळत नाही.

जेव्हा पीक जास्त असते आणि बाजारात मागणी असते तेव्हा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढतात. कांदा उत्पादक शेतकरी सरकारच्या या धोरणामुळे चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे.

तुलनात्मक बाजारभाव

मागच्या वर्षी कांद्याला याच महिन्यात ३५००/ प्रति क्विंटल असा भाव होता. आता सध्या कांद्याला २५००/ प्रति क्विंटल भाव मिळत आहे. काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी भाव मिळत आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या मनात नाराजीचा सूर उमटला आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit