मुंबई : देशातून कर्ज बुडवून फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्याकडून आपली रक्कम वसूल करण्यावरून बँकांना मोठा झटका बसला असून सक्त अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) युनायटेड ब्रेव्हरिजच्या २००० कोटी रुपयांचे शेअर्स विकण्याच्या बँकांच्या विनंतीला फेटाळले आहे. 

हे शेअर्स नेदरलॅण्ड येथील ब्रुइंग कंपनी खरेदी करू इच्छित आहे. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका जाणकार अधिकाऱ्याने सांगितले की, बँकांनी जप्त केलेले हे शेअर्स जारी करण्यासाठी निवेदन केले होते. मात्र, त्यांची मागणी ईडीने फेटाळली आहे. शेअर्सची किंमत घसरत असून नंतर ते शेअर्स सवलतीमध्ये विकण्यात आले, तर त्याला जबाबदार कोण असेल, ईडी जबाबदार असेल का, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.