‘गारवा’च्या मालकाच्या हत्येत एका तरुणीला अटक

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- गारवा हाॅटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या हत्येच्या आरोपातील आरोपींची तलवार घरात लपवून ठेवणे एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

काजल अटकेत :- उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणी काजल चंद्रकांत कोकणे (वय १९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी ) या तरुणीला अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरलेली तलवार घरात लपवून आरोपींना मदत केल्याच्या आरोपाखाली लोणी काळभोर पोलिसांनी ही कारवाई केली.

दोन तलवारी काजलकडे :- आखाडे यांच्यावर १८ जुलैला खुनी हल्ला झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली असून, एका १७ वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

Advertisement

आखाडे यांच्यावर तलवारीने वार करून पसार झालेल्या दोघांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या तपासात गुन्ह्यात वापरलेल्या दोन तलवारी लपविण्यासाठी पोत्यात गुंडाळून काजलकडे दिल्याची माहिती पोलिसांना दिली.

त्यानुसार पोलिसांनी बिबवेवाडी येथील काजलच्या घरी केलेल्या चौकशीत तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर घराच्या झडतीत कपाटाच्या मागे पोत्यात गुंडाळलेल्या दोन तलवारी पोलिसांना सापडल्या.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker