मोबाईल वापरत असालच ! मग वाचा 1 सप्टेंबरपासून बदलणारे ‘हे’ 3 नियम

MHLive24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- सध्या मोबाईल वापरत नाही असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. आता या मोबाईलसंदर्भात काही गोष्टी येत्या एक तारखेपासून बदलणार आहेत. जाणून घेऊयात त्याविषयी सविस्तर 

Disney+ Hotstar OTT प्लेटफॉर्मने भारतीय ग्राहकांसाठी तीन नवीन प्लान्स आणले आहेत. हे प्लान्स १ सप्टेंबरपासून उपलब्ध होतील. यामुळे सबस्क्रिप्शन घेतलेल्या ग्राहकांना स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर आपल्या आवडत्या सीरिज आणि चित्रपटांचा आनंद घेता येईल. भारतात सध्या डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन प्लान ४९९ रुपयांपासून सुरू होऊन १४९९ रुपयांपर्यंत जातात.

याचाच अर्थ 1 सप्टेंबरपासून OTT प्लॅटफॉर्म Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन महागणार आहे. युझर्सना बेस प्लॅनसाठी 399 रुपयांऐवजी 499 रुपये मोजावे लागणार आहेत. युझर्सला आधीच्या प्लॅनपेक्षा आता 100 रुपये जादा भरावे लागणार आहेत.

Advertisement

1 सप्टेंबरपासून अमेझॉनवरून ऑर्डर करणं महाग होऊ शकतं. डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे कंपनी लॉजिस्टिक्स खर्च वाढवू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला 500 ग्रॅमच्या पॅकेजसाठी 58 रुपये मोजावे लागू शकतात. राज्यानुसार किंवा विभागानुसार खर्च 36.50 रुपये असेल.

15 सप्टेंबरपासून गुगल प्ले स्टोअरवरील 100 अॅपसाठी विशेष दस्तऐवज आणि काही तरतुदी नियम बदलण्यात आले आहेत. ते दिल्याशिवाय तुम्हाला हे अॅप वापरता येणार नाहीत. गुगल ड्राईव्ह युझर्ससंदर्भात 13 सप्टेंबरला एक अपडेट मिळणार आहे. त्यानुसार गुगल असिस्टंटची जागा आता गुगल ड्राईव्ह घेणार का हे पाहावं लागणार आहे.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker