पैसे काढण्यासाठी ATM मध्येही जाण्याची गरज नाही, थेट घरीच येतील पैसे

MHLive24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी बँक PNB (पंजाब नॅशनल बँक) आपल्या ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंग सुविधा पुरवत आहे, म्हणजेच आता बँकच तुम्हाला तुमच्या दारात बँकिंग सुविधा देईल. यासाठी बँकेने एक अॅप देखील लॉन्च केले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या बँकिंगचा लाभ घेऊ शकता. पंजाब नॅशनल बँकेच्या वतीने ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या बँकिंगबद्दल तपशीलवार जाणून घेऊयात 

या सुविधेमुळे आता ग्राहकांना पैसे काढण्यासाठी अगदी ATM मध्येही जाण्याची गरज नाही. बँकेचाच एक कर्मचारी तुमच्या घरी येऊन तुम्हाला पैसे देईल. याशिवाय, चेक जमा करण्यासाठी किंवा अन्य सोपस्कार पार पाडण्यासाठीही बँकेचा कर्मचारी तुमच्या घरी येईल.

ही सेवा सशुल्क असली तरी त्यासाठी फार कमी पैसे द्यावे लागतील. डोअरस्टेप बँकिंग सुविधेत तुम्ही कमीत कमी 1000 आणि जास्तीत जास्त 10 हजार रुपये काढू शकता. एका व्यवहारासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क आकारले जाईल.

Advertisement

ही सुविधा तुम्हाला कशी मिळेल ? :- डोअरस्टेप बँकिंगचा लाभ उठवण्यासाठी तुम्हाला बँकेत केवायएसी जमा करावे लागतील. बँकेच्या नेहमीच्या कार्यालयीन वेळेतच तुम्हाला या सेवेचा लाभ उठवता येईल. ही सेवा पूर्णपणे सुरक्षित असल्याचा बँकेचा दावा आहे. या सुविधेची अधित माहिती मिळवण्यासाठी 1800 10 37 188 या टोल फ्री क्रमांकावर फोन करता येईल. याशिवाय, तुम्ही https://www.psbdsb.in/ या अधिकृत संकेतस्थळालाही भेट देऊ शकता.

डोअरस्टेप बँकिंगचे फायदे :- पंजाब नॅशनल बँकेच्या डोअरस्टेप बँकिंगसाठी तुम्हाला शाखेला भेट देण्याची गरज नाही. यासह, त्यात सेवा शुल्क खूप कमी आहे. यावेळी SBI, PNB, युनियन बँक, BoB, BoI, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, UCO बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पंजाब आणि सिंध बँक ह्या सुविधा ग्राहकांना प्रदान करत आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker