Create your own QR code : तुम्ही तुमचा स्वतःचा QR कोड बनवू शकता; ‘हा’ आहे सोपा मार्ग

MHLive24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- तुम्ही कधी ना कधीतरी नक्कीच QR code पहिला असेल, कदाचित त्याचा वापर देखील केला असेल. QR code एक चौरासाकृती आकृती असते ज्यावर पांढरा पृष्ठभागावर काळे छोटे चौरासाकृती ठिपके असतात.(Create your own QR code)

ज्यामध्ये encoded विशेष माहिती साठवली जाते. या QR code मध्ये एखादा फोटो असू शकतो, व्हिडिओ असू शकतो किंवा एखाद्या प्रॉडक्ट किंवा मग कंपनी बद्दल माहिती देखील असू शकते.

हे कोड एक प्रकारचे bar code आहेत फक्त ते bar code पेक्षा जास्त प्रगत आहेत. आपण यात bar code पेक्षा जास्त माहिती साठवून ठेवू शकतो आणि हे वापरण्यास देखील खूप सुरक्षित आहेत.

Advertisement

तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालवत असाल तर तुम्ही देखील ऑनलाईन पेमेंटसाठी QR कोड वापरू शकता. यामुळे पेमेंट करणे सोपे आणि सुरक्षितही होईल. QR कोड मिळवणे अवघड काम नाही. काही टप्प्यांचे पालन करून तुम्ही तुमचा स्वतःचा QR कोड तयार करू शकता.

QR code चा फुलफॉर्म काय आहे ?

QR code एक आधुनिक बारकोड आहे. QR code full form आहे Quick Response code. हा कोड बारकोड पेक्षा खूप जास्त जलद असतो आणि माहिती साठवण्याची क्षमताही बारकोड पेक्षा जास्त असते.त्यामुळे आज जवळपास सर्वच ठिकाणी बारकोड ऐवजी QR code चा वापर केला जात आहे.

Advertisement

QR code कसा तयार करावा ?

तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या मोबाईलवर QR कोड बनवू शकता. त्यासाठी गूगलवर अनेक QR code generator वेबसाइट्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा QR कोड बनवू शकता.

पण Qr कोड बनवण्या अगोदर तुम्हाला निश्चित करावे लागेल की तुम्हाला कशासाठी हा कोड बनवायचा आहे व यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती साठवून ठेवायचे आहे. त्यानुसार तुम्ही मग static किंवा dynamic यापैकी एका QR code ची निवड करू शकता.

Advertisement

भारतात क्यूआर कोड कसा तयार करायचा ?

तुम्ही किरकोळ विक्रेते किंवा दुकानदार असाल, तर तुम्ही भारत QR कोड सहजपणे जनरेट करू शकता आणि खालील पायऱ्या वापरून पेमेंट घेणे सुरू करू शकता:
प्रथम तुमचे बँक खाते असल्याची खात्री करा
तुमचे बँक खाते BHIM अॅपशी लिंक करा
BHIM अॅपवरून तुमचा युनिक भारत QR कोड तयार करा
QR कोड प्रिंट करा आणि पेमेंट काउंटरच्या भिंतीवर पेस्ट करा
यानंतर ग्राहक तुमचा QR कोड स्कॅन करून सहज पैसे देऊ शकतात

पेमेंट कसे करावे ?

Advertisement

पेमेंट करण्यासाठी तुमच्या फोनवर तुमचे बँक अॅप किंवा BHIM अॅप इंस्टॉल केलेले असणे आवश्यक आहे. तुम्ही कुठेही स्टोअरमध्ये जाल, तुम्हाला अॅप उघडावे लागेल आणि स्कॅन QR कोड किंवा स्कॅन आणि पेवर टॅप करावे लागेल. यानंतर भारत क्यूआर कोड स्कॅन करा.

कोड स्कॅन केल्यावर देय रक्कम एक टिप्पणी आणि चार अंकी पासकोडसह प्रविष्ट करणे आवश्यक आहे. पडताळणी पूर्ण होताच पैसे दुकानाच्या किंवा दुकानदाराच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker