राज कुंद्राच्या याचिकेवरचा निकाल ठेवला राखून

MHLive24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- अश्लील साहित्य तयार करून त्याचे प्रसारण केल्याच्या या आरोपात प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेत्री राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रॉयन थौर्प यांना पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेला दिलेल्या आव्हान अर्जावर सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

पुरावे नष्ट होत असताना पोलिसांनी नुसते बघत बसायचे? :- पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केलेल्या उद्योगपती राज कुंद्रा याच्या याचिकेवरील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आरोपी पुरावे नष्ट करत असेल तर पोलिसांनी बघत बसायचे का, असा युक्तिवाद मुंबई पोलिसांकडून करण्यात आला.

लॅपटॉपमधून मिळाले 68 व्हिडिओ :- अजय गडकरी यांच्यापुढे आज यावरील सुनावणी पूर्ण झाली. पोलिसांना आतापर्यंत कुंद्राच्या लॅपटॉपमधून 68 व्हिडिओ मिळाले असून अद्याप डिलीट केलेला अन्य डाटा रिकव्हर करण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत, असे प्रमुख सरकारी वकील अरुणा पै-कामत यांनी न्यायालयात सांगितले.

Advertisement

यापूर्वी 51 व्हिडिओ पोलिसांना मिळाले होते. तसेच दोघांना पोलिसांनी पूर्वसूचना देणारी नोटीस बजावली होती; मात्र त्यापैकी कुंद्राने नोटीस घेतली नाही, तर थौर्पने नोटीस घेतली असेही या वेळी सांगण्यात आले.

अश्लील कथानकाच्या सापडल्याप्रती :- हाॅटशाॅट आणि बोलीफेमचा कुंद्रा ॲडमिन आहे आणि त्याच्या लॅपटॉपमध्ये अश्लील कथानकाच्या प्रती सापडल्या असा दावा करण्यात आला. कुंद्राने पुरावे डिलीट केल्याचा आरोप त्याच्या वकिलांनी फेटाळला. पोलिसांनी अटकेआधीच लॅपटॉप आणि मोबाईल ताब्यात घेतला होता, मग चॅट कसे डिलीट करणार, असा सवाल ॲड आबाद पोंडा यांनी केला. थौर्पला नोटिशीला उत्तर देण्यासाठी पुरेसा अवधी देण्यात आला नाही, असे त्याचे वकिल अभिनव चंद्रचूड यांनी सांगितले.

जामीनअर्जावर सात तारखेला निकाल :- दरम्यान, कुंद्राने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर सात तारखेला न्यायालय निकाल देणार आहे. पोलिसांनी जप्त केलेले व्हिडीओ पोर्नोग्राफी कक्षेत येत नसून ते शाॅर्ट फिल्म आहेत, असा दावा कुंद्राने केला आहे तर तपास करत असताना कुंद्राने व्हाॅटसप चॅट डिलीट केले असा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांनी फौजदारी दंड संहिता कलम 41 अ नुसार कुंद्राला अटक केली आहे तर ही अटक बेकायदेशीर आहे असा कुंद्राचा दावा आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker