Withdraw PF for these things : तुम्ही नोकरीला असाल तर ‘ह्या’ 8 गोष्टींसाठी पीएफचे पैसे काढू शकतात, जाणून घ्या सविस्तर

MHLive24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- नोकरदार व्यक्तींसाठी निवृतीनंतर मिळणारी एम्प्लॉयी प्रॉव्हिडंड फंड (EPF) अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम अत्यंत महत्त्वाची असते. मुलांचं लग्न, शिक्षण, अकस्मात खर्च यासाठी या फंडातून गरजेच्या वेळी पैसे काढता येतात.(Withdraw PF for these things)

नोकरदार वर्ग आपल्या पगारातील एक हिस्सा पीएफच्या रुपात जमा करतात. पीएफ खात्यात जमा झालेले पैसे आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा परत काढू शकतो. विशेष म्हणजे या पैशांवर व्याजदर चांगले मिळत असते. पीएफ परंतु तुम्हाला माहिती आहे का?

पीएफच्या खात्यात तुम्ही तुमचा पूर्ण पैसा काढू शकत नाहीत. खात्यातील पूर्ण पैसा तुम्ही काही परिस्थितीमध्येच काढू शकतात.

Advertisement

आपल्या आयुष्यात अनेक टप्पे येत असतात, या महत्त्वाच्या टप्प्यांवर आपल्याला पैशांची गरज लागत असते. अशाच वेळी तुम्हाला पीएफमधून पैसे मिळत असतात.

(1) गृहकर्जाची परतफेड

यासाठी तुमची नोकरी 10 वर्षे केलेली असावी.
या अंतर्गत कोणतीही व्यक्ती त्याच्या मूळ पगाराच्या जास्तीत जास्त 36 पट पीएफ पैसे काढू शकते.
यासाठी तुमच्या नोकरीच्या काळात पीएफचे पैसे फक्त एकदाच वापरले जाऊ शकतात.

Advertisement

(2) गंभीर आजारपणाच्या उपचारासाठी 

जर तुम्ही आपल्या परिवारातील सदस्यांचा उपचार करायचा असेल आणि यासाठी पैशांची गरज असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पैसे काढू शकतात. पण यासाठी तुम्ही एक महिन्यांपेक्षा जास्त काळ आजारपण राहिले असलाल तर त्याची माहिती द्यावी लागेल. यासह काही आवश्यक गोष्टींची पुर्तता करावी लागते.

खातेधारकाला आपल्या एम्प्लॉयर किंवा ईएसआयकडून एक मान्यता प्रमाणपत्र द्यावे लागेल. या प्रमाणपत्रात घोषित केलेले असते की, ज्याला मेडिकल उपचार पाहिजे, तेव्हापर्यंत (ESI)ईएसआयची सुविधा नाही दिली जाणार किंवा त्याला ईएसआयची सुविधा नाही मिळणार.

Advertisement

(3) लग्नासाठी

तुमच्या कुटुंबातील कोणाच्या लग्नासाठी पैसा लागत असेल तर तुम्ही त्यातून पैसा काढू शकतात. दरम्यान यासाठी तुमची सर्विस हिस्ट्री म्हणजे कार्याचा काळ किती आहे तो पाहिला जातो. यात तुम्हाला कमीत-कमी ७ वर्ष नोकरी असली पाहिजे.

(4) शिक्षणासाठी

Advertisement

जर शिक्षणासाठी तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्हाला तुमच्या एम्पलायरकडून फॉर्म-३१च्या अंतर्गत अर्ज करावा लागेल. या स्थितीत तुम्ही फक्त ५० टक्के पैसे काढू शकतात.

(5) प्लॉट खरेदी करण्यासाठी

प्लॉट खरेदी करण्यासाठी पीएफचे पैसे वापरण्यासाठी तुमचा कार्यकाळ 5 वर्षांचा असावा. प्लॉट तुमच्या, तुमच्या पत्नीच्या किंवा दोघांच्या नावे नोंदणीकृत असावा.

Advertisement

भूखंड किंवा मालमत्ता कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नये आणि त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये.

कोणताही व्यक्ती प्लॉट खरेदी करण्यासाठी त्याच्या पगाराच्या जास्तीत जास्त 24 पट पीएफचे पैसे काढू शकतो.

अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या नोकरीच्या एकूण वेळेत फक्त एकदाच पीएफचे पैसे काढू शकता.

Advertisement

(6) घर किंवा फ्लॅट बांधणे

या प्रकारात आपल्या नोकरीची 5 वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे.
या अंतर्गत कोणतीही व्यक्ती त्याच्या पगाराच्या जास्तीत जास्त 36 पट पीएफ पैसे काढू शकते.
यासाठी तुमच्या नोकरीच्या काळात पीएफचे पैसे फक्त एकदाच वापरले जाऊ शकतात.

(7) घर नूतनीकरण

Advertisement

या परिस्थितीत तुमच्या नोकरीची किमान 5 वर्षे पूर्ण झाली पाहिजेत.
या अंतर्गत कोणतीही व्यक्ती त्याच्या पगाराच्या जास्तीत जास्त 12 पटीपर्यंत पीएफचे पैसे काढू शकते.
यासाठी तुमच्या नोकरीच्या काळात पीएफचे पैसे फक्त एकदाच वापरले जाऊ शकतात.

(8) निवृत्तीपूर्वी

यासाठी तुमचे वय 54 वर्षे असावे.
तुम्ही एकूण पीएफ शिल्लक पैकी 90% काढू शकता, परंतु हे पैसे काढणे एकदाच करता येते.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker