ATM money withdrawl : आता एटीएममधून पैसे काढणे महागणार, आता लागू होणार ‘हे’ नवीन चार्जेस

MHLive24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- नवीन वर्षात एका नियमात बदल होणार आहे. सण 2022 पासून एटीएममधून पैसे काढणे अधिक महाग होणार आहे. पुढील महिन्यापासून, एटीएम मधून पैसे काढणे महागणार आहे. युजर्सने जे मोफत एटीएम व्यवहाराची मर्यादा आहे ती एकदा ओलांडली कि अधिक शुल्क भरावे लागणार आहे.(ATM money withdrawl )

अॅक्सिस बँकेने सांगितले की, रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अॅक्सिस बँक किंवा इतर बँकांच्या एटीएममध्ये मोफत मर्यादेपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाल्यास चार्ज 21 रुपये प्लस जीएसटी असेल. हे सुधारित दर 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील.

पुढील महिन्यापासून ‘इतका’ वाढेल चार्ज

Advertisement

आतापर्यंत, मोफत व्यवहारांची मासिक मर्यादा ओलांडण्यावर ग्राहकांना 20 रुपये शुल्क द्यावे लागत होते. आता पुढील महिन्यापासून प्रति व्यवहार 21 रुपये प्लस जीएसटी भरावा लागेल. रिझव्‍‌र्ह बँकेच्या एका सर्क्युलरनुसार बँकांना शुल्क वाढवून प्रति व्यवहार 21 रुपये करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

फ्री मध्ये करता येतील 5 ट्रॅन्जेक्शन

बँकांच्या एटीएममधून पाच मोफत व्यवहार करण्याची परवानगी दिली जाईल. यामध्ये आर्थिक आणि बिगर आर्थिक व्यवहारांचा समावेश असेल. ग्राहकांना मेट्रो शहरांमधील इतर बँकांच्या एटीएममधून 3 विनामूल्य आणि मेट्रो नसलेल्या केंद्रांवर 5 व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Advertisement

इंटरचेंज ट्रांजैक्शन फीस वाढली

याशिवाय आरबीआयने प्रति व्यवहार इंटरचेंज फी वाढवण्यासही मान्यता दिली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आले आहे. गैर-आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आली आहे. ते 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होईल.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker