३१ जुलैनंतर लॉकडाऊन उठणार कि राहणार ? उद्धव ठाकरे म्हणतात …

MhLive24 टीम , 24 जुलै  2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन ३१ जुलै रोजी संपत असून त्यानंतर निर्बंध शिथील केले जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी ‘येत्या १ ऑगस्टपासून लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथिल केले जातील,’ असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक काल पार पडली.

या बैठकीत उद्धव यांनी लॉकडाऊन संदर्भात आपली भूमिका मांडली. राज्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतर नेमकं काय होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. या सर्वांनाच दिलासा देण्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

Advertisement

‘मुंबई आणि आसपासच्या परिसरात आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याचे काम सुरू आहे. सध्या असलेले निर्बंध आणखी शिथिल केले जातील. याला लॉकडाऊन म्हणण्याऐवजी अनलॉकडाऊन म्हणणं योग्य ठरेल,’ असंही उद्धव यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केलं.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलैनंतरचं धोरण ठरवण्यासाठी राज्य सरकार केंद्राच्या सूचनांची वाट पाहणार आहे. ‘निर्बंध शिथील होतील,

तसंच राज्यांना निर्णय घेण्याची मुभा दिली जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. केंद्राच्या सूचनांवरच राज्याचा निर्णय आणि मार्गदर्शक सूचना अवलंबून असतील,.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker