Tips to increase WiFi speed : घरातील वायफाय त्रास देतेय का? खालील स्टेप्स फॉलो करून वाढवा स्पीड

MHLive24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- आजचे जग हे संपूर्णतः टेक्नॉलॉजीवर सुरु आहे. आज जवळपास बहुतांश व्यक्ती इंटरनेट वापरत आहे. आज आपल्या जवळजवळ सर्व कामांसाठी इंटरनेट लागतेच. त्यामुळे हि गरज भागवण्यासाठी अनेकांनी घरात वायफाय राउटर बसवले आहेत.(Tips to increase WiFi speed )

परंतु बऱ्याचदा असे घडते की तुमचा राउटर नीट काम करत नाही, ज्याचा थेट परिणाम इंटरनेटच्या स्पीडवर होतो. आज आपण या ठिकाणी अशाच काही टिप्स पाहणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या वायफाय राउटरचा इंटरनेट स्पीड बूस्ट करू शकता.

सिग्नल्स रोखणारे घटक काढून टाका

Advertisement

भिंती आणि मोठ्या धातूच्या वस्तू तुमच्या घरात बसवलेल्या वायफाय राउटरच्या सिग्नलला अडथळा ठरत असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या वायफाय राउटरच्या सिग्नलमध्ये कोणताही अडथळा येऊ नये असे वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला राउटरच्या समोरील सर्व प्रकारच्या धातूच्या वस्तू काढून टाकाव्या लागतील.

इलेक्ट्रॉनिक वस्तू दूर ठेवा

जेव्हाही तुमच्या घरात वायफाय राउटर बसवले जाईल तेव्हा हे लक्षात ठेवा की ते इतर कोणत्याही सिग्नल इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या अगदी जवळ ठेवू नका कारण सिग्नल एकमेकांना भिडल्यानंतरही कमजोर होतात आणि यामुळे तुमचे इंटरनेट धीमे होऊ शकते.

Advertisement

वायफाय राउटर अँटेनाची जागा बदला

तुम्ही व्यवस्थित लक्ष दिल्यास, तुम्हाला कळेल की प्रत्येक वायफाय राउटरमध्ये अँटेना असतो. या अँटेनाच्या मदतीने वायफाय राउटरला इंटरनेटसाठी सिग्नल मिळतात. कधी हा अँटेना राउटरच्या आत असतो तर कधी बाहेर असतो. जर तुमचा वायफाय सिग्नल स्लो असेल, तर सर्वप्रथम तुमच्या राउटरच्या अँटेनाची पोझिशन बदलून पहा. यामुळे डेटा स्पीड मध्ये मोठा फरक पडतो.

उंच जागेवर वायफाय राउटर बसवा

Advertisement

वायफाय राउटर बसवताना, लक्षात ठेवा की तुम्ही ते उपकरण तुमच्या घरात उंच ठिकाणी स्थापित केले पाहिजे. वायफाय राउटर उंच ठिकाणी ठेवल्यास इंटरनेट सर्वांपर्यंत सहज पोहोचेल आणि सिग्नलमध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही.

या सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या घरात इन्स्टॉल केलेल्या वायफाय राउटरचा वेग निश्चित बूस्ट करू शकता.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker