‘या’ नेत्याचा एवढा तीळपापड का ?

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दाैयाच्या वेळी एका महिलेने, ‘तुम्ही काही पण करा, आमदार, खासदारांचा एक महिन्याचा पगार फिरवा; पण आमचं नुकसान भरून द्या,’ असं सांगितलं.

महिलेच्या या उद्गाराने आमदार भास्कर जाधव यांचा तीळपापड झाला. त्यांनी लगेच या महिलेला प्रत्युत्तर दिलं. त्यांनी वापरलेल्या भाषेवरून आता टीका सुरू झाली आहे.

काय घडलं ? :- भर बाजारपेठेत एक महिला पुरात तिच्या घराचं नुकसान झाल्याचं ओरडून ओरडून सांगत होती. मदतीची याचना करत होती. ही मला रडतच आपल्या भावना व्यक्त करत होती. तिचा हा आक्रोश ऐकून मुख्यमंत्री थोडावेळ थांबले.

Advertisement

तिचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सर्व मागण्या पूर्ण करू असं तिला आश्वासन दिलं. या वेळी महिलेचे उद्‌गार ऐकून आमदार, खासदार पाच महिन्यांचा पगार देतील. त्याने काही होणार नाही. चला बाकी काय? तुझा मुलगा कुठंय अरे आईला समजव.. आईला समजव. उद्या ये, असं जाधव तावातावाने बोलत होते.

जाधव यांच्या वागण्याचीच चर्चा :- भास्कर जाधव यांचे हातवारे, त्यांचा चढलेला आवाज आणि त्यांची बॉडी लँग्वेज पाहून सर्वच जण बुचकळ्यात पडले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भेटीपेक्षा जाधव यांच्या वागण्याचीच चर्चा अधिक रंगली.

भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे :- भास्कर जाधव, हा माज बरा नव्हे, हेच लोक तुम्हाला निवडून देतात आणि ठरवलं तर घरी पण बसवतात. त्या महिलेची परिस्थिती काय? तुम्ही तिला बोलताय काय? सर्वसामान्यांनी मुख्यमंत्र्यांना काही सांगायचं नाही, बोलायचं नाही का? बरं कुणाचं ऐकायचं नव्हतं तर दौरे कशाला करता?, असा सवाल पत्रकार शैलजा जोगळ यांनी केला आहे.

Advertisement

“साहेब, तुम्ही हात नका जोडू” :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी दुकानदारांच्या व्यथा समजून घेताना मुख्यमंत्र्यांचे हात जोडले गेले. तेव्हा जाधव यांनी धावत जवळ येत “साहेब, तुम्ही हात नका जोडू” अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. हा संवाद कॅमेरात कैद झाला आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker