मंदिरे बंद असो अथवा सुरू, गणपती आम्हाला पावतो: नारायण राणे

MHLive24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- येत्या काळात कोकणातील नगरपालिका, जिल्हा परिषद, आमदार, खासदार सर्वत्र भाजपचे साम्राज्य दिसेल इतर कोणत्याही राजकीय पक्षाला स्थान नसेल असा दृढ विश्वास नारायण राणे यांनी कोकण जन आशीर्वाद यात्रेदरम्यान पाली येथे सोमवारी व्यक्त केला. मंदिरे बंद असो अथवा सुरू, गणपती आम्हाला पावतो असे नारायण राणे बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यावर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात राज्यात भाजपच्या वतीने नव्याने केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झालेल्या केंद्रीय मंत्री जनतेत जाऊन आशीर्वाद घेत आहेत. सर्वत्र जनतेचे भरभरून प्रेम व उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहे. असे राणे म्हणाले.

केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता उद्योग मंत्री नारायण राणे हे कोकणात भारतीय जनता पक्षाचा जनाधार व पक्षसंघटना मजबूत व बलाढ्य करण्याच्या दृष्टीने सरसावले आहेत. नारायण राणे यांनी कोकण जनाआशीर्वाद यात्रेचा प्रारंभ अष्टविनायकाचे प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पालीत बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले.

Advertisement

राज्य सरकारला मंदिरे सुरू करायला भीती वाटते, मंदिरे सुरू केली आणि यांचे सरकार पडायचे, आम्हाला मंदिरे सुरू असो वा बंद , आम्हाला गणपती पावतो असा टोला केंद्रीय मंत्रीपदाचा नवनियुक्त कारभार स्वीकारलेल्या नारायण राणे यांनी राज्य सरकारला लगावला. राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्ट कारभारावर सतत बोलणार असे राणे म्हणाले.

महाराष्ट्र्र व भारत देशाचे नाव आपल्या कार्यकर्तृत्वाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले. प्रत्येक गोरगरीब, सामान्यातील सामान्य घटकाला विविध योजनांच्या माध्यमातून सुख सुविधा देण्याचे काम मोदी सरकारने केलेय.असे राणे म्हणाले.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांच्यासह बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड: धनंजय धारप व विश्वस्त मंडळाने ना. राणे यांचा सत्कार केला.

रायगड जिल्ह्यासह राज्यात जन आशीर्वाद यात्रेचा झंजावत व जनतेकडून उत्स्फूर्त स्वागत होतेय. नारायण राणे ‘जन आशीर्वाद’ यात्रेला प्रारंभ झाला आहे. ही यात्रा मुंबई ते सिंधुदुर्ग अशी मार्गक्रमण होत आहे. १९ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट अशी आठ दिवस ही ‘जन आशीर्वाद’ यात्रा चालणार आहे. २३ ऑगस्ट रोजी दक्षिण रायगड जिल्हा जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली असून या यात्रेच्या नियोजनाचे प्रमुख ही जबाबदारी पक्षाने महाराष्ट्र प्रदेश सचिव मा.प्रमोदजी जठार यांच्यावर सोपवली आहे.

Advertisement

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कोकण जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ पाली बल्लाळेश्वराच्या पावन भूमीतुन प्रारंभ झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी कोकण जन आशीर्वाद यात्रेला हिरवा कंदील दाखविला. यावेळी बल्लाळेश्वर मंदिर ते पालीतील शिव स्मारक अशी भव्य रॅली काढण्यात आली.

नारायण राणे यांनी यावेळी स्मारकात छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राबविलेल्या सर्व योजना व उपक्रम तळागाळातील जनतेपर्यंत पोहचाव्यात यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली असल्याचे ना.राणे म्हणाले. या जन आशीर्वाद यात्रेला सर्वत्रच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांच्या नेतृत्वाखाली ना. राणे यांच्या स्वागताला पाली नगरी सजली होती. सर्वत्र स्वागताचे बॅनर व कमान लागल्या होत्या. पाली गावातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी पालीत भाजपमय वातावरण झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. पाली, वाकण, कोलाड, माणगाव , महाड, पोलादपूर व चिपळूण याठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

Advertisement

कार्यकर्त्यांचा उत्साह उल्लेखनीय होता. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की प्रधानमंत्री मोदी साहेबांनी दिलेला मंत्रीपदाचा प्रसाद घेऊन जनतेत जा, त्यांचे आशीर्वाद घ्या, लोकांना केंद्र सरकारच्या जनमाणसाला व तळागाळातील घटकाला स्पर्श करणाऱ्या मूलभूत योजना यांची माहिती देण्याची भूमिका घेऊन केंद्रीय मंत्री जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेतेत जातायेत, याला उदंड प्रतिसाद मिळतोय असे चंद्रकांत दादा पाटील म्हणाले.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker