FD: आता सध्या कुठे मिळतेय जास्त व्याज ? जाणून घ्या सर्व एका क्लिकवर

MHLive24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- मुदत ठेव (FD) हा गुंतवणूकदारांचा अत्यंत लोकप्रिय गुंतवणुकीचा प्रकार आहे. परंतु अलीकडील काळात एफडीवरील व्याजदर फार कमी झाले आहेत. त्यामुळे आता सामान्य बँकेत मुदत ठेव (FD) घेणे हानिकारक ठरू शकते. कारण सध्या व्याजदर कमी आहेत आणि महागाईचा दर खूप जास्त आहे.(FD)

त्यामुळे तुम्हाला महागाईच्या दरापेक्षा कमी व्याज मिळेल. परिणामी, तुमचे पैसे कालांतराने वाढण्याऐवजी कमी होतील.

तथापि, ज्यांना रिस्क घ्यायची नसते त्यांच्यासाठी ही अजूनही सर्वोत्तम गुंतवणूक आहे. कारण FD मध्ये कोणताही धोका नाही. तुमचा 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा देखील यात समाविष्ट असतो.

Advertisement

गुंतवणूकदारांनी काय करावे?

तुम्ही देखील रिस्क न घेणाऱ्यातले गुंतवणूकदार असाल, तर तुमच्यासाठी FD हा एक उत्तम पर्याय आहे. सध्या, बँका दीर्घ मुदतीच्या मुदत ठेवींवर 5% ते 6.5% दरम्यान व्याजदर देत आहेत. तथापि, तुम्ही तुमचे पैसे एफडीमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, बँका आणि पोस्ट ऑफिसद्वारे ऑफर केलेल्या व्याजदरांची तुलना करा. या ठिकाणी काही व्याजदे जाणून घेऊयात

येस बँक

Advertisement

येस बँकेत 6 महिने ते 1 वर्षासाठी 5-5.5टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी 5.75-6 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी 6 टक्के, 3-5 वर्षांसाठी 6.25 टक्के आणि 5 वर्षांवर 6.5 टक्के व्याज दर दिला जात आहे.

DCB बँक

DCB बँकेत, 6 महिने ते 1 वर्षासाठी 5.45 टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी 5.3-5.95 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी 5.5 टक्के, 3-5 वर्षांसाठी 5.95 टक्के आणि 5 वर्षांहून अधिक काळ समान व्याजदर दिला जात आहे.

Advertisement

अॅक्सिस बँक

अॅक्सिस बँकेत 6 महिने ते 1 वर्षासाठी 4.4 टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी 5.10-5.25 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी 5.4 टक्के, 3-5 वर्षांसाठी 5.4 टक्के आणि 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी 5.75 टक्के व्याजदर दिला जात आहे.

आरबीएल बँक

Advertisement

RBL बँकेत 6 महिने ते 1 वर्षासाठी 4.5-5.25 टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी 6 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी 6 टक्के, 3-5 वर्षांसाठी 6.3 टक्के आणि 5 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी 5.75- 6.3 % व्याजदर दिला जात आहे.

एसबी आय

SBI 6 महिने ते 1 वर्षासाठी 4.4 टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी 5 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी 5.1 टक्के, 3-5 वर्षांसाठी 5.3 टक्के आणि 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी 5.4 टक्के ऑफर करत आहे.

Advertisement

आयसीआयसीआय बँक

ICICI बँकेत 6 महिने ते 1 वर्षासाठी 3.5-4.4 टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी 4.9-5 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी 5-5.15 टक्के, 3-5 वर्षांसाठी 5.15-5.35 टक्के आणि 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी 5.35-5.5% व्याज दर ऑफर केले जात आहे.

एचडीएफसी बँक

Advertisement

एचडीएफसी बँकेचे 6 महिने ते 1 वर्षासाठी 4.4 टक्के, 1 ते 2 वर्षांसाठी 4.9 टक्के, 2 ते 3 वर्षांसाठी 5.15 टक्के, 3-5 वर्षांसाठी 5.3 टक्के आणि 5 पेक्षा जास्त काळासाठी 5.5 टक्के व्याजदर आहेत.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker