पवार जेव्हा रस्त्यावर उभे राहून गुळाचा चहा घेतात, तेव्हा…

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- दुकान मोठे, की छोटे असा विचार उद्‌घाटनासाठी नेते करीत नाहीत. कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते कृतीतून दाखवून दिले.

सेंद्रीय गुळाच्या चहाच्या स्टाॅलचे उद्‌घाटन :- कार्यकर्त्यांचा आग्रह होतो आणि त्या आग्रहाला नाही म्हणणे पवार यांनाही शक्य होत नाही, त्याच्या फिरत्या सेंद्रीय गुळाच्या चहाच्या दुकानाचेही उदघाटन उपमुख्यमंत्री करतात आणि उभ्या उभ्या त्याच्या गुळाच्या चहाचा आस्वादही ते घेतात. बारामतीत आज हा किस्सा घडला.

तालुक्यातील कांबळेश्वर येथील तुषार खलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आपला हक्क आपला व्यवसाय या उपक्रमाखाली फिरत्या चहा विक्रीच्या दुकानाची सुरुवात केली आहे. आज महाआरोग्य अभियानाच्या निमित्ताने अजित पवार येणार होते. त्या वेळेस तुषार यांनी पवार यांना आपल्या या छोट्याशा व्यवसायाचे उद्‌घाटन तुम्ही करावे अशी इच्छा बोलून दाखवली.

Advertisement

व्यवसायाची चाैकशी :- क्षणाचाही विलंब न करता पवार लगबगीने त्याच्या फिरत्या दुकानाजवळ गेले, त्यांनी फीत कापून उदघाटन केले आणि त्याने दिलेल्या गुळाच्या चहाचा आस्वादही घेतला. तेवढ्या वेळात त्यांनी व्यवसाय व त्याच्या विषयीही चौकशी केली.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker