जेव्हा ऐश्वर्या राय ब्लाउज नसलेल्या साडीमध्ये दिसली तेव्हा…

MhLive24 टीम , 23 जुलै  2020 :- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरी तिच्या चाहत्यांची संख्या आजही कमी झालेली नाही. ऐश्वर्या आजही आपल्या अदा, ग्लॅमरस लुक आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. परंतु एकदा ऐश्वर्याने एका चित्रपटामध्ये जेव्हा ब्लाउज परिधान न करताच साडी नेसली होती,

तेव्हा तिला पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एखादी अभिनेत्री ब्लाउजविना साडी नेसलेले स्वतःचे स्टायलिश फोटो जेव्हा सोशल मीडियावर पोस्ट करते तेव्हा तुफान चर्चा घडून येते. आताचेच उदाहरण पहा ना ..

नुकतेच प्रियंका चोपानं एका आंतरराष्ट्रीय मासिकासाठी फोटोशूट केलं होतं . त्यात तिने बिन ब्लाउजची साडी परिधान केली होती. त्यानंतर उठलेल्या वादळाने प्रियंकाला व डिझायनरला माफीही मागावी लागली होती.

Advertisement

ऐश्वर्या राय बच्चन या प्रकरणात थोडीशी भाग्यवान ठरली आहे. ब्लाउजशिवाय साडी नेसून जेव्हा ऐश्वर्या लोकांसमोर आली तेव्हा तिला पाहण्यासाठी अक्षरशः गर्दी झाली होती. २००३ मध्ये ऐश्वर्या राय बच्चनचा बंगाली सिनेमा ‘चोखेर बाली’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

या सिनेमामध्ये ऐश्वर्यानं ब्लाउज परिधान न करताच साडी नेसली होती. ऐश्वर्याने या चित्रपटात एकापेक्षा एक सुंदर साड्या परिधान केल्या असताना, तिच्या बिन ब्लाउजच्या साडीचीच चर्चा जास्त झाली होती.

या चित्रपटात ऐश्वर्याने एका विधवेची भूमिका साकारली होती, ज्यासाठी तिचे सर्व कपडे बंगाली डिझायनर जॉय मित्राने डिझाइन केले होते. ब्रिटिश राजवट असताना ब्लाउजविना साडी नेसण्याची पद्धत सर्वात जास्त बंगालमध्ये प्रचलित होती.

Advertisement

त्याकाळी भारतीय महिला आपली एक बाहु उघडी ठेवून साडी नेसत. असे म्हटले जाते की त्याकाळी इंग्र महिला डिज़ाइनर कोरसेट मध्ये स्वतःला व्यवस्थित झाकून वेष परिधान करतात असत. ब्रिटिशांना ही अशी साडी नेसण्याची ही पद्धत अजिबात पसंत नव्हती,

असे म्हटलं जाते. यासाठी त्यांनी एक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेस बंगाली समाजसुधारक ज्ञानंदिनी देवी यांनी प्रोत्साहन दिले आणि साडीसह ब्लाउज परिधान करण्याची परंपरा सुरू केली.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24.com वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा mhlive24@gmail.com वर

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker