Surprise for whatsapp users :’ह्या’ व्हॉट्सअॅप यूजर्सना मिळणार खास सरप्राईज! पूर्वीसारखे नाही राहिले अॅप, जाणून घ्या सर्वकाही

MHLive24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सपैकी एक, WhatsApp गेल्या काही महिन्यांपासून आपल्या यूजर्स साठी अनेक नवीन फीचर्स आणत आहे. अलीकडेच अशी बातमी आली आहे की व्हॉट्सअॅपने आपल्या बीटा वापरकर्त्यांसाठी काही मोठे बदल केले आहेत. जाणून घेऊया त्यांबद्दल..(Surprise for whatsapp users)

बीटा यूजर्सना असे दिसेल व्हॉट्सअॅप

व्हॉट्सअॅपने अलीकडेच आपल्या बीटा वापरकर्त्यांसाठी नवीन अपडेट जारी केले आहे, ज्यामुळे आता या वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअॅपचा आयकॉन बदलण्यात आला आहे. आता या यूजर्ससाठी व्हॉट्सअॅपचा नवा शॉर्टकट जारी करण्यात आला आहे. या अपडेटनंतर, अॅप 2.21.24.6 वर्जन वर काम करत आहे.

Advertisement

आता व्हिडिओ कॉल करणे आणखी सोपे झाले आहे

बीटा यूजर्स साठी जारी करण्यात आलेल्या या खास अपडेटमध्ये व्हिडिओ कॉलिंग देखील सोपे झाले आहे. WABetaInfo च्या अहवालात असे म्हटले आहे की नवीन अपडेटनंतर, यूजर एखाद्याचे स्टेटस पाहतानाच त्या व्यक्तीला व्हिडिओ कॉल करू शकतील.

हे करण्यासाठी, जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहत असाल, तेव्हा स्क्रीनच्या वरच्या बाजूला तुम्हाला तीन ठिपके दिसतील, ज्यावर तुम्ही क्लिक केल्यास तुम्हाला ‘व्हिडिओ कॉल’चा पर्याय दिसेल.

Advertisement

हे अपडेट कोणाला मिळेल

वर केल्याप्रमाणे, WhatsApp ने सर्व वापरकर्त्यांसाठी हे अपडेट जारी केले नाही तर फक्त त्या यूजर्स साठी जे WhatsApp ची बीटा वर्जन वापरत आहेत. तसेच, सध्या हे अपडेट फक्त Android बीटा यूजर्स साठी जारी केले गेले आहे परंतु लवकरच ते iOS वापरकर्त्यांसाठी देखील जारी केले जाईल.

हे नवीन अपडेट बीटा व्हर्जनला देऊन, WhatsApp या बदलांची टेस्ट करत आहे जेणेकरुन पुढे ते सर्व यूजर्स साठी हे अपडेट जारी करू शकेल.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker