WhatsApp Feature Update : लय भारी ! व्हॉट्सअॅपने ‘ह्या’ फीचरमध्ये केले मोठे अपडेट

MHLive24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत. आणि त्यात व्हॉट्सअॅप हे मेसेजिंग अॅप जवळजवळ प्रत्येकजण वापरतो. यामुळे, लोकांना चांगली चॅटिंग सुविधा देण्यासाठी कंपनी नव-नवीन गोष्टी त्यात ऍड करत राहते. नवनवीन अपडेट आणत असते.(WhatsApp Feature Update)

आता कंपनीने Disappearing Messages फिचर्समध्ये मध्ये एक मोठे अपडेट केले आहे. मेसेजिंग प्लॅटफॉर्मने गेल्या वर्षी Android आणि iOS वरील वापरकर्त्यांसाठी ऍटोमेटिक गायब होणारे मॅसेज हे फिचर आणले. हा बदल तुमच्या चॅटिंगची शैली बदलेल आणि तुमच्या चॅट्स सुरक्षित करेल.

Whatsapp ने हे अपडेट केले आहे

Advertisement

Disappearing Messages फीचरमध्ये व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांकडे आता सर्व नवीन चॅटसाठी डिफॉल्टनुसार अदृश्य संदेश चालू करण्याचा पर्याय असेल. यासोबतच तुम्हाला २४ तास आणि ९० दिवसांचे दोन कालावधीचे पर्याय दिले जातील.

यामध्ये, तुम्ही निवडलेल्या गायब होणाऱ्या संदेशाच्या कालावधीत तुमचे चॅट आपोआप गायब होतील. हे अंमलात आणण्यासाठी, तुम्हाला व्हॉट्सअॅप मोबाइल अॅपवरील प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन ‘डीफॉल्ट मेसेज टाइमर’ वर टॅप करावे लागेल.

‘अशा’ पद्धतीने इनेबल करा Disappearing Message फीचर

Advertisement

यासाठी प्रथम तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप खाते उघडावे लागेल.
त्यानंतर ज्या कॉन्टॅक्टसाठी तुम्हाला हे फीचर सक्रिय करायचे आहे त्याचा शोध घ्या.
त्यानंतर कॉन्टॅक्टच्या प्रोफाईलवर जा.
जिथे तुम्हाला Disappearing Message फीचरचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
आता त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही 24 तास, 7 दिवस किंवा 90 दिवस यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.

डिसअपीयरिंग मॅसेज डिसेबल कसा करावा ?

याशिवाय कोणताही युजर्स कधीही गायब होणारा मॅसेज डिसेबल देखील करू शकतो.
सर्व प्रथम, तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप चॅट उघडावे लागेल.
आता तुम्ही संपर्काच्या नावावर टॅप करू शकता.
आता अदृश्य संदेशावर टॅप करा. त्यानंतर Continue वर क्लिक करा.
आता तुम्ही Off पर्याय निवडून ते बंद करू शकता.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker