सावधान! व्हॉट्सअॅपचे ‘हे’ फिचर असेल तर तुमचा सर्व डेटा होऊ शकतो चोरी; जाणून घ्या काय करतात हॅकर

MHLive24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात आवडते आणि लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सपैकी एक आहे. कारण हे अॅप त्याच्या वापरकर्त्यांना सर्व प्रकारची फीचर्स देते आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी देखील घेते. ( Whatsapp feature that can stolen user data )

व्हॉट्सअॅपचे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फीचर्स वापरकर्त्याच्या चैट्स, त्यांचे फोटो, व्हिडिओ इत्यादी सर्व काही सुरक्षित ठेवते आणि केवळ पाठवलेल्यांनाच पाहण्याची परवानगी देते. एवढी खबरदारी घेतल्यानंतरही सायबर चोर म्हणजेच हॅकर्स त्यांचा मार्ग शोधतातच . आम्ही तुम्हाला एका लेटेस्ट बग बद्दल सांगणार आहोत , ज्याद्वारे हॅकर तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट मिळवू शकतो…

लेटेस्ट व्हाट्सएप बग :- अलीकडेच असे वृत्त आले आहे की हॅकर्स यूजर चे व्हॉट्सअॅप खाते एका नवीन पद्धतीने हॅक करू शकतात. व्हॉट्सअॅपच्या इमेज फिल्टर फीचरमध्ये हा बग सापडला आहे आणि त्याचे नाव ‘Out-of-Bounds Read-Write Vulnerability’ आहे. व्हॉट्सअॅपला सर्वप्रथम चेक पॉईंटच्या रिसर्चर्स नी या बगबद्दल माहिती दिली होती.

Advertisement

हे व्हॉट्सअॅप बग कसे कार्य करते :- चेक पॉईंट संशोधकांचे म्हणणे आहे की हा बग व्हॉट्सअॅपच्या फेब्रुवारी v2.21.1.13 अपडेटमध्ये इमेज फिल्टर फीचरसह आला आहे. हॅकर वापरकर्त्याला अनुचित फोटो पाठवून, नंतर ते इमेज फिल्टर वापरून खाते हॅक करू शकतो. पण चेक पॉईंट संशोधकाने असेही सांगितले आहे की हे करणे सोपे काम नाही.

हॅकरला यात यशस्वी होण्यासाठी दीर्घ प्रक्रियेतून जावे लागते. हॅकरला आधी एक अनुचित चित्र तयार करावे लागते, नंतर ते व्हॉट्सअॅपच्या इमेज फिल्टरवर अपलोड करावे आणि नंतर जेव्हा वापरकर्ता त्या अनुचित फोटो असलेल्या फिल्टरवर फोटो क्लिक करेल, तेव्हा ती प्रतिमा हॅकरकडे नेली जाईल. मग त्या फोटो द्वारे हॅकर वापरकर्त्याच्या खात्याची सर्व माहिती मिळवू शकेल.

यासाठी व्हॉट्सअॅपने काय सोल्युशन काढले ? :- व्हॉट्सअॅपने आपल्या सुरक्षा सल्लागार वेबसाइटवर वर या बगविषयी माहिती टाकली होती आणि व्हॉट्सअॅप इमेज फिल्टरमधून हा बग काढून टाकण्यातही यशस्वी झाला आहे. कंपनीने सोर्स आणि फिल्टर इमेज वर आणखी दोन सिक्योरिटी चेक ऐड केल्या आहेत.

Advertisement

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker