कोरोना काळात आपली आरोग्य विमा पॉलिसी कशी असावी ? वाचाल तर फायद्यात राहाल

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :- गेल्या एका वर्षादरम्यान, आपल्या कुटुंबास कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी आपण बरीच पावले उचलली असतील. जसे की, हाताने वारंवार स्वच्छता करणे, लोकांपासून अंतर पाळून उभे राहणे, फार महत्वाचे असेल तेव्हाच घराबाहेर पडणे आणि घरातून बाहेर पडण्यापूर्वी फेस मास्क लावणे या गोष्टीही आपण केल्याच.

या सर्व गोष्टी आपल्याला कोरोनासारख्या साथीच्या आजारापासून वाचविण्यास मदत करतात.कोरोनामुळे आज प्रत्येकाला आरोग्याचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे प्रत्येकजण आरोग्याविषयी अलर्ट झाला. यासाठी स्वत: बरोबर कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजना करू लागले आहेत.

प्रामुख्याने आता आरोग्य विमा घेण्याकडे कल वाढत आहे. यासाठी एलआयसीपासून ते खासगी कंपन्यांकडे पॉलिसीबाबत विचारणा केली जात आहे. यात कमी प्रीमियममध्ये जास्त फायदा असलेल्या प्लॅनविषयी विचारणा होत आहे. तुम्ही कोणता इन्शुरन्स निवडावा हेपूर्णपणे तुमच्या आरोग्यावर अवलंबून आहे.

Advertisement

यासह, तुम्ही राहत असलेलं शहर आणि तिथल्या आसपासच्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी लागणाऱ्या खर्चावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ, दक्षिण मुंबई या उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करणं महाग आहे.

पण, अचानक काही झाल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे या भागात राहणाऱ्या व्यक्तीला मोठी रक्कम असलेला विमा काढावा लागेल. कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी वेगळा आरोग्य विमा काढण्यास प्राधान्य द्या.

हा विमा जरी कौटुंबिक योजनेचा भाग असला तरी कुटुंबातील प्रत्येकासाठी त्यांची विम्याची स्वतंत् ररक्कम असायला हवी. एखादी महामारी अथवा साथीचा रोग आल्यास कुटुंबातील बऱ्याच सदस्यांना रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं अशावेळी फॅमिली प्लॅन्समधील मर्यादांमुळे कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागतो.

Advertisement

एक योग्य हेल्थकेअर प्लॅन घेतल्यानंतर टॉप-अप्सची निवड देखील करा. टॉप-अप्स या आरोग्यसेवा योजना आहेत, ज्या मूलभूत रकमेची हमी संपल्यानंतर वाढीव खर्चाची भरपाई करतात. प्रति लाख टॉप-अप्सच्या कव्हरची किंमत कमी आहे.

तसंच,येणाऱ्या वर्षांत,आरोग्यासाठी लागणारा खर्च वाढेल आणि आपली आताची विमा रक्कम पुरेशी ठरणार नाही. वय वाढल्यानंतर नवीन किंवा अतिरिक्तकव्हर मिळवणं महाग पडतं अशावेळी टॉप अप प्लॅन कामी येतात. काही गंभीर आजारांसाठी विमा कव्हर उपलब्ध आहे. भविष्यात तुम्हाला किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजाराचं निदान झाल्यास ही टॉप अप कव्हर फायदेशीर ठरतात.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker