काय सांगता! ‘ह्या’ बँकेत क्रिप्टोकरन्सीद्वारे करू शकता FD आणि RD मध्ये गुंतवणूक, एका दिवसासाठीही मिळेल कर्ज

MHLive24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :-  भारतात लवकरच ब्रिटनची एक नवी क्रिप्टोकरंसी बँक सुरु होणार आहे. क्रिप्टोकरंसी बँक कॅशा भारतात आपलं कामकाज सुरु करणार आहे. एका रिपोर्टनुसार, कॅशा भारतात बिटकॉईनप्रमाणेच एक व्हर्च्यूअल करन्सी म्हणून काम करेल.

येत्या ऑगस्ट महिन्यात या करन्सीचं लाँचिंग होणार आहे. कॅशाचे हे काम पूर्णपणे क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या माध्यमातून होणार आहे. यामध्ये युनायटेड आणि काशाची भागीदारी असेल.

BusinessToday.in च्या अहवालानुसार, क्रिप्टोकरन्सी बँक कॅशा (युनिकास) भारतात बचत, कर्ज आणि व्यापार संबंधित सेवा सुरू करू शकते. 15 ऑगस्टच्या आसपास बँकेचे कामकाज सुरू होताच ग्राहकांना फिक्स्ड डिपॉझिट एफडी आणि रिकरिंग डिपॉझिट आरडीमध्ये बिटकॉइनसारख्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी दिली जाऊ शकते.

Advertisement

बँक ग्राहकांसाठी अशी योजना बनवत आहे. क्रिप्टोमध्ये उघडण्यात येणारी एफडी सुरु केली जाईल, तिचा काही मॅच्युरिटी कालावधी असेल. जसे बँका छोट्या ठेवी असलेल्या लोकांनाही गुंतवणूक करण्याची परवानगी देतात, कॅशा क्रिप्टोच्या ग्राहकांसाठीही अशीच योजना बनवत आहे. लोकांना हवे असल्यास, ते छोट्यापासून दररोज क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक सुरू करू शकतात.

काय आहे बँकेची तयारी ? :- युनिकासचे व्यवस्थापकीय भागीदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश कुकरेजा या योजनेबद्दल सांगितले की, किरकोळ ठेवीदार किंवा व्यापाऱ्यांना सेवा देणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

ज्याप्रकारे आपले भविष्य सुनिश्चित करण्याशाठी एफडी आणि आरडी सेवा घेतल्या जातात, त्याच सेवा क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून एफडी आणि आरडीमध्ये देण्याची योजना आहे. ग्राहकांसाठी एक सुविधा निर्माण करावी लागेल ज्यात ते जेव्हा हव्या असतील तेव्हा गुंतवणूक सुरू करू शकतात.

Advertisement

किती व्याज मिळेल :- भारतीय रुपये आणि क्रिप्टोकरन्सीसाठी बचत खात्याअंतर्गत कॅशाकडे विविध उत्पादने आहेत. यामध्ये ते वार्षिक 4 टक्के ते 9.67 टक्क्यांपर्यंत व्याज दर देतील. आपण क्रिप्टोकरन्सीमधून कर्जदेखील घेऊ शकता. युनिकास दररोज 0.04 टक्के दराने व्याज घेतील. हे एका दिवसापेक्षा कमी कालावधीसाठी कर्ज घेण्यास देखील परवानगी देते.

कॅशाच्या मते, भारतीय बँका क्रिप्टोकरन्सी आणि एक्सचेंजवर कडक कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, भारतात क्रिप्टो करन्सीवर औपचारिकपणे बंदी घातली गेली नाही. त्यामुळे, एक्सचेंजेस आता फियाट सेवांसाठी कॅशाकडे वळत आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker