काय सांगता! नागरिकांना खात्री पटावी यासाठी पंतप्रधानांनीच घेतली कोरोनाची लस

Mhlive24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे. अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. प्रत्येक देश लशीकडे डोळे लावून बसला आहे.
अशा परिस्थितीमध्ये संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका कंपनीने लस तयार केली आहे. देशातल्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या लशीच्या वापराला आणीबाणीच्या परिस्थितीत परवानगी देण्यात आल्याचं पंतप्रधान शेख मोहोम्मद बीन अल मखदूम यांनी सांगितलं.
परंतु लोकांच्या मनात या लशीविषयी भीती निर्माण झाली आहे. ती भीती घालवण्यासाठी पंतप्रधान शेख मोहोम्मद बीन अल मखदूम यांनीच ही लस घेत सुरक्षेची खात्री दिली. देशातल्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून या लशीच्या वापराला
आणीबाणीच्या परिस्थितीत परवानगी देण्यात आल्याचं शेख मोहम्मद यांनी सांगितलं. देशातल्या नागरिकांचं आरोग्य उत्तम कसं राहिल याची आम्ही काळजी घेत आहोत असंही ते म्हणाले. गेल्या काही आठवड्यांपासून UAEमध्ये ही लस देण्यात येत आहे.
आपल्या मंत्रिमंडळातल्या अनेक सहकाऱ्यांनीही ही लस घेतल्याची माहिती त्यांनी दिली. UAEमधल्या अधिकारी आणि डॉक्टरांनी या लशीसाठी अतिशय मेहनत घेतली आहे असंही त्यांनी सांगितलं.
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर