काय सांगता ! ‘ही’ बाईक बुक केली असेल तर 66,000 रुपयांपर्यंत नुसती सबसिडीच मिळणार

MHLive24 टीम, 25 जुलै 2021 :- ओला ई-स्कूटरचे बुकिंग आता फक्त 499 रुपयांमध्ये करता येणार आहे. ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच जाहीर केले की त्याचे स्कूटर खरेदी करण्यास इच्छुक ग्राहक ते फक्त 499 रुपयांमध्ये बुक करू शकतात. ही रक्कम देखील रिफंडेबल आहे.

ओलाच्या या ई-स्कूटरचे नाव एस 1 असू शकते. फायनान्शियल एक्स्प्रेसने सरकारच्या अधिकृत ट्रेड रजिस्टरी मधून गोळा केलेल्या माहितीनुसार ओला इलेक्ट्रिकला तीन नावांची ट्रेड मार्किंग मिळाली आहे. एस 1, एस 1 प्रो आणि सीरीज एस अशी ही नावे आहेत.

या स्कूटरची अद्याप किंमत किती असेल हे बाहेर आलेले नसले तरी देखील या स्कूटरवर मिळणारी बससिडी पाहून तुमचे डोळे गांगरणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने इलेक्ट्रीक स्कूटर, कारवर सबसिडी जाहीर केल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रीक स्कुटरच्या किंमती या 42-57% पर्यंत कमी होणार आहेत.

Advertisement

गणित समजून घ्या… :- हीरो ऑप्टिमा ईव्हीची किंमत 1.22 लाख रुपये असेल तर केंद्र सरकार 39 हजार आणि दिल्ली राज्य सरकार 15000 रुपए सबसिडी देते. महाराष्ट्र सरकारने देखील गेल्या आठवड्यात ईव्ही पॉलिसी जाहीर केली आहे.

यानुसार ईव्ही वाहनांवर 2.75 लाख रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. यानुसार रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स फ्री करण्यात आला आहे. यामुळे या एकंदरीत सबसिडीचा विचार करता 54000 रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. म्हणजेच हीरो ऑप्टिमा 64 हजार रुपयांना पडेल.

केंद्र सरकारची सबसिडी डीलरला मिळते तर राज्य सरकारची सबसिडी ही ग्राहकांच्या खात्यात जाणार आहे. महाराष्ट्रात स्कूटरवर ही सबसिडी 25000 रुपयांपर्यंत मिळते. अशावेळी जर ओला बुक केली असेल आणि जर ओला ईलेक्ट्रीक स्कूटरची किंमत 1.30 लाख रुपये असेल तर केंद्राची 39 हजार आणि राज्याची 25000 रुपये असे मिळून जवळपास 64000 रुपये वाचणार आहेत. म्हणजेच ओला ईलेक्ट्रीक स्कूटर 66000 रुपयांना मिळेल.

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker