काय सांगता! कोरोनाच्या लशीमुळं लाखो शार्कचा जाणार बळी

Mhlive24 टीम, 28 सप्टेंबर 2020 :- जगभरात कोरोनाचं संकट मानव जातीला आव्हान देतंय. या संकटातून पार होण्यासाठी जगाच्या काना कोपऱ्यात संशोधन सुरू आहे. लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी, यासाठी मेडिकल सायन्स क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मंडळी झटत आहेत. 

ही लस तयार करताना मात्र निसर्गाचा समतोल ढासळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. कोरोनाची लस तयार करण्यासाठी शार्क माशाच्या यकृतातील तेल आणि शार्कच्या रक्तातील अंश वापरण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

त्यामुळे लाखो  शार्क माशांचा जीव धोक्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. स्काय न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. शार्कच्या यकृतात Squalene हे एक प्रकारचं नैसर्गिक तेल आढळतं. अनेक कोरोना लशींमध्ये हा महत्त्वपूर्ण असा घटक असल्याचं सांगितलं जातं आहे.

Advertisement

लशीची परिणामकता वाढवण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो आहे. कोरोना लशीच्या एका डोसची गरज पडल्यास अडीच लाख तर दोन डोसची गरज पडल्यास पाच लाख शार्क मारावे लागतील असा दावा या संस्थेने केला आहे.

शार्क अलाइज् संस्थेची संस्थापक स्टीफनी ब्रेन्डिल यांनी म्हटले आहे की, इतक्या मोठ्या प्रमाणावर सागरी जीव मारणे, उचित होणार नाही. मुळात शार्कमध्ये प्रजनन मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे शार्कचा जीव जाणे निश्चित धोक्याचे आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker