‘मी काय राज कुंद्रा आहे?’ राज ठाकरे यांचा कॅमेरामनला मिश्कील सवाल

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :-  राज ठाकरे मनसेच्या पुणे कार्यालयात दाखल झाल्यानंतर कॅमेरामननी त्यांना गराडा घातला. राज कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. काही अर्ज-विनंत्या पाहत होते. त्या वेळी कॅमेरामन त्यांचे शूटिंग करत होते. हे राज ठाकरे यांच्या लक्षात आले. बराचवेळ कॅमेरामन शूटिंग करत आहेत हे पाहिल्यावर त्यांनी कॅमेरामनना हटकले, तरीही कॅमेरामन ऐकेनात.

ते शूटिंग करीत होते; मात्र कॅमेरामनांवर न रागावता ते त्यांच्याकडे पाहून हसले. ‘माझं कान, नाक सगळं शूट करून झालं का?… किती वेळ तेच तेच शूटिंग करता? मी काय कुंद्रा आहे का?… असा खास शैलीतील ‘राजटोला’ त्यांनी लगावला. त्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

अगोदर अचंबित, नंतर हास्यकल्लोळ :- पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आहेत. राज हे सडेतोड, मिश्कील आणि बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कार्यकर्त्यांच्या भेठीगाठी घेत असताना एक कॅमेरामन त्याचे चित्रीकरण करीत होता, त्या वेळी ‘राज यांनी मी काय राज कुंद्रा आहे का? ‘ अशी विचारणा केल्याने अगोदर उपस्थित अचंबित झाले आणि नंतर हास्यकल्लोळात बुडाले.

Advertisement

महापालिकेच्या जय्यत तयारीला :- राज यांच्या या टिपणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. २०२२ मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज पुणे दौऱ्यावर आहेत. ते हापालिका निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागले असून ते संघटनेच्या बांधणीवर भर देत आहेत. राज यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येत आहेत.

तीन दिवस मुक्काम :- राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे मुक्कामी असणार आहेत. या तीन दिवसांत राज पक्षाच्या शाखाध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष अशा कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या नेमणुका जाहीर करणार आहेत. या तीन दिवसांच्या दौऱ्यात ठाकरे हे विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशीहीदेखील संवाद साधणार आहेत.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker