कार विकली तर फास्टॅगचे काय? लक्षात ठेवा करावे लागेल ‘ही’ प्रक्रिया

MHLive24 टीम, 29 जुलै 2021 :- कारमध्ये फास्टॅग लावणे बंधनकारक झाले आहे. किंबहुना आता फास्टॅग हे रस्ता कर भरण्याचे एक साधन बनले आहे. कारमध्ये फास्टॅग न लावल्यास आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. आता एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारे बहुतेक लोकांनी आपल्या गाडीवर फास्टॅग लावला आहे. परंतु तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे फार आवश्यक आहे.

ते म्हणजे, फास्टॅग रिचार्ज कसे करावे आणि ते कसे कार्य करते ? तुम्ही कधी विचार केला आहे की जर आपण आपली कार विक्री केली तर या फास्टॅगचे काय होईल? तसेच जर काही कारणास्तव कारची पुढील काच तुटली तर फास्टॅगचे काय होईल? अशा परिस्थितीत फास्टॅगसाठी वेगळी व्यवस्था केली गेली आहे.

त्या प्रक्रियेद्वारे तुम्ही या समस्येतून मार्ग काढू शकता. याठिकाणी आपण वाहन किंवा तुमची कार तुम्ही विकली तर फास्टॅगचे काय करायचे याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? याचसंदर्भात जाणून घेऊया.

Advertisement

कार विकली तर फास्टॅगचे काय होईल ? :- जर तुम्ही तुमची कार विकली तर तुम्हाला तुमचा फास्टॅग बदलावा लागेल. कारण या फास्टॅगशी तुमचे बॅंक अकाउंट जोडलेले असेल. त्यामुळे फास्टॅग बदलणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचा फास्टॅग बंद करावा लागेल, कारण फास्टॅग ट्रान्सफर करता येत नाही.

अर्थातच काही पेमेंट प्लॅटफॉर्मवर फास्टॅग ट्रान्सफर करण्याचा पर्यायदेखील दिला जातो. त्यामुळे कार ट्रान्सफर करण्याबरोबरच तुम्ही तुमचा फास्टॅगदेखील बंद करू शकता किंवा तुम्ही तुम्ही ज्या व्यक्तीला ही कार विकली आहे त्या व्यक्तीच्या बॅंक खात्याशी हा फास्टॅग जोडून घ्यावा.

फास्टॅग बंद किंवा ट्रान्सफर कसा करायचा ? :- तुमचा फास्टॅग बंद करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बॅंक किंवा वॉलेट कंपनीशी संपर्क करावा लागेल. तुम्ही कस्टमर केअरवर फोन करून फास्टॅग सहजरित्या बंद करू शकता. आवश्यकता असल्यास तुम्ही सहजपणे नवीन फास्टॅगदेखील बनवून घेऊ शकता. याशिवाय पेटीएम फास्टॅगला ट्रान्सफर करण्याचादेखील पर्याय देते.

Advertisement

तुम्ही दुसऱ्या इतर फोन नंबरवर याला ट्रान्सफर करू शकता. यानंतर हा फास्टॅग दुसऱ्या नंबरला जोडला जाईल. हे काम तुम्ही एटीएम अॅपद्वारेदेखील करू शकता. मात्र फास्टॅग बंद करण्यासाठी तुम्हाला कस्टमर केअरवर संपर्क करावा लागेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker