Impoertant News : ATM मधून पैसे काढायला गेले अन पैसेच निघाले नाहीत परंतु खात्यातून कट झाले? बँक तुम्हाला दर दिवसाला देईल 100 रुपये; ‘असा’ करावा लागेल अर्ज

MHLive24 टीम, 13 डिसेंबर 2021 :- डिजिटल युगात लोक ऑनलाइन पेमेंट पद्धती वापरून पैशांचा व्यवहार करत आहेत. दुकानातून एखादी छोटी वस्तू खरेदी करण्यापासून ते कोणत्याही मोठ्या कामाचे डिजिटल पेमेंट केले जात आहे. परंतु असे असतानाही एटीएममधून पैसे काढूनही जास्त पैसे पेमेंटसाठी वापरले जातात.(Impoertant News)

जिथे रोख रक्कम आवश्यक असेल तिथे एटीएम मशीनमधूनच पैसे काढले जातात. परंतु असे करताना एटीएममधून व्यवहार करताना बरेच वेळा ट्रांजेक्शन फेल होतात.

ट्रांजेक्शन फेल झाल्यानंतर बँक खातेधारकाच्या खात्यातून पैसे वजा केले जातात परंतु एटीएममधून पैसे काढले जात नाहीत. अशा परिस्थितीत खातेदारांना काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही.

Advertisement

डिजिटल व्यवहारादरम्यानही ग्राहकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांना यासंदर्भात कठोर सूचना केल्या आहेत ज्या अंतर्गत ग्राहकांना त्यांचे ट्रॅन्जेक्शन फेलचे पैसे वेळेवर न दिल्याबद्दल बँकेला दंड भरावा लागतो.

आरबीआयच्या नियमांनुसार बँकांना खातेदाराकडे सात दिवसांत पैसे ट्रान्सफर करावे लागतात. जर तसे केले नाही तर ग्राहकाला बँकेकडून दररोज 100 रुपये भरपाई दिली जाते.

अर्ज कसा करावा ?

Advertisement

अर्ज करण्यापूर्वी काही अटी खातेदारांना लागू होतात. उदाहरणार्थ, ट्रांजेक्शन फेल झाल्याच्या 30 दिवसांच्या आत बँकेत अर्ज करावा लागेल. 30 दिवसानंतर अर्ज केल्यास बॅंका अर्ज स्वीकारण्यास बांधील नसतात. याशिवाय व्यवहाराची स्लिप किंवा अकाउंट स्टेटमेंट व एटीएम कार्डचा तपशील पुरावा म्हणून बँकेला द्यावा लागतो.

नुकसान भरपाईसाठी, अर्ज फॉर्म (परिशिष्ट 5 फॉर्म) भरावा लागेल. हा फॉर्म भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर, बँकेला तुमचे पैसे रिटर्न द्यावे लागतात. असे झाले नाही तर आपल्याला बँकेकडून दररोज 100 रुपये भरपाई दिली जाईल .

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker