लॉकडाऊनच्या काळात गावाकडे गेलात ? मग तेथेच सुरु करा ‘हा’ व्यवसाय; होईल बक्कळ कमाई

MHLive24 टीम, 30 जुलै 2021 :- भारतात कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात नोकरीसाठी आलेले तरूणांना पुन्हा गावाला जावे लागले. लॉकडाऊनमुळे बरेच छोटे मोठे उद्योग बंद पडल्यामुळे अनेकांचा रोजगारही गेला. आताच्या कोरोनाच्या संकटात कोणता व्यवसाय करावा हे त्यांना कळत नाही.

बहुतेक वेळा चुकीचा व्यवसाय करतात आणि नुकसान करून बसतात. परंतू जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही कच्च्या पपईवर प्रक्रिया करून त्यापासून टूटी फ्रुटी बनविण्याचा व्यवसाय करू शकता. हा एक चांगला लघु उद्योग आताच्या काळात तुम्ही करू शकता.

टुटी फ्रुटी म्हणजे काय :- कच्चा पपईवर प्रक्रिया करून टुटी फ्रुटी बनवली जाते. यामध्ये प्रामुख्याने पपईच्या तुकड्यावर साखर आणि कृत्रिम रंगाची प्रक्रिया केली जाते.

Advertisement

टूटी फ्रूटीचा वापर :- मसाला पान मुखवास आईस्क्रीम बेकरी उत्पादने इत्यादींमध्ये टूटीफ्रूटी चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

बाजारपेठेतील मागणी :- जर आपण आपल्या आजूबाजूच्या पान शॉपचा जरी विचार केला तरी आपल्याला टूटी फ्रूटीच्या वापराबाबत कल्पना येईल. आईस्क्रीम उद्योग, बेकरी उद्योग अशा सगळ्या उद्योगांमध्ये टूटीफ्रूटीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

वरती उल्लेख केलेल्या सगळ्या उत्पादनांची मागणी ही दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे, त्यामुळे पर्यायाने टूटीफ्रूटीचा वापर आणि मागणी यांच्यात प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे.

Advertisement

टूटीफ्रूटी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल

  • कच्ची पपई
  • साखर
  • कृत्रिम रंग
  • सायट्रिक ऍसिड
  • मीठ आणि पॅकिंगसाठी लागणाऱ्या प्लास्टिक पिशवी
  • टुटी फ्रुटी बनवण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री
  • साल काढण्यासाठी लागणारे यंत्र
  • पपईचे लहान तुकडे करण्यासाठी लागणारी क्युबिंग मशीन
  • पन्नास लिटर क्षमतेचा बॉयलर
  • कॅटल( शिजवण्याची यंत्र)
  • ड्रायर( वाळवणी यंत्र)
  • वजन काटा
  • पॅकिंग मशीन

प्रक्रिया पद्धत

  • तुटी फुटी तयार करण्यासाठी ताइवान ७८६ या जातीची कच्ची पपई वापरतात.
  • टुटी फ्रुटी तयार करताना अगोदर कच्च्या पपईची साल काढून घ्यावी लागते, त्यानंतर पपईचे तुकडे करून ते १८ टक्के मिठाच्या द्रावणात २१ दिवस भिजत ठेवले जातात.
  • त्यानंतर तुकडे बाहेर काढून ते स्वच्छ पाण्याने धुऊन घेउन त्याचे क्युबिंग मशीनद्वारे लहान तुकडे करतात.
  • या प्रक्रियेनंतर पपईचे पपईचे तुकडे कॅटल मशीनमध्ये वाफेच्या सहाय्याने शिजवले जातात.
  • शिजवून घेतलेले पपईचे तुकडे तीस टक्के साखरेच्या व तीन टक्के सायट्रिक ऍसिडच्या पाण्यात २४ तास ठेवले जातात.
  • पपईचे तुकडे साखरेच्या पाण्यातून बाहेर काढून पुन्हा केटेल मशीनमध्ये शिजवले जातात. व त्यामध्ये कृत्रिम रंगाचा वापर केला जातो.
  • त्यानंतर ते वाळवणे यंत्राद्वारे वाळवून उत्तमरीत्या पॅकिंग केले जातात.

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker