Weather Alert: राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता… वाचा बातमी पावसाची

MHLive24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :-  राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. पुढील काही दिवसही पावसाचेच असणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील 5 दिवस राज्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.(Weather Alert)

पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील सलग तीन दिवस पुण्यात वेगवान वाऱ्याच्या साथीने विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

राज्यभरात पावसाचा अंदाज असला तरी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता नाही. परंतु, काही ठिकाणी हलक्या सरी बरसू शकतात.

Advertisement

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून राजस्थानच्या जैसलमेर पासून चित्तोडगड, तिकामगड, अंबिकापूर, पुरी ते बंगालच्या उपसागरात पर्यंत सक्रीय आहे. पश्चिम राजस्थान आणि छत्तीसगड परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तेलंगणा परिसरावरही नव्याने चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.

झारखंड परिसरावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र निवळून गेले आहे. यातच म्यानमारच्या किनाऱ्यालगत असलेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती मुळे पूर्व मध्य बंगाल उपसागरात आज दिनांक 24 रोजी सायंकाळपर्यंत नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून ते ओरिसाच्या किनाऱ्यावर येणार याची शक्यता आहे.

राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

Advertisement

मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे.

तर पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

 

Advertisement
  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker