Adani Group :  केंद्रात मोदी सरकार आल्यापासून अदानी समूह भरभराटीला आला आहे. समूहाकडून बरेच प्रोजेक्ट उपलब्ध झाले आहेत. अशातच अदानी समूहाचे शेअर्सदेखिल भरपूर प्रमाणात उसळी घेत आहेत.

अशातच अदानी ग्रुपचा एक शेअर भरपूर उसळी घेत आहे. मात्र अशातच अदानी समूहाची खाद्य तेल कंपनी अदानी विल्मार आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवल्यानंतर आता कंगाल होत आहे.

आज म्हणजेच गुरुवारी अदानी विल्मारचे शेअर्स NSE वर 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर आहेत. आज अदानी विल्मारच्या शेअरची किंमत 680.20 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

एकंदरीत विचार केला तर मार्च तिमाहीत कंपनीला मोठा तोटा झाला आहे. त्यामुळे निराश झालेले गुंतवणूकदार नफा वसूल करून बाहेर पडत आहेत.

आठवडाभरापूर्वी ज्यांनी यात गुंतवणूक केली असेल, त्यांचे जवळपास 16 टक्के नुकसान झाले आहे. यानुसार पूर्णपणे कमकुवत लिस्टिंग असूनही, अदानी विल्मार चे शेअर्स रॉकेटसारखे सतत धावत होते.

आता घसरणीचा ट्रेंड थांबण्याचे नाव घेत नाही. शेअरने 227 रुपयांवरून 878 रुपयांपर्यंत झेप घेतली होती. आता ते आतापर्यंतच्या उच्चांकावरून सुमारे 162 रुपये प्रति शेअरने खाली आले आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध आणि महागाईमुळे खाद्यतेलाच्या मागणी आणि पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अदानी विल्मारच्या निव्वळ नफ्यात घट झाली आहे.

अदानी विल्मार ही खाद्यतेलाच्या बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे. त्याचा प्रसिद्ध ब्रँड फॉर्च्यून आहे. अदानी विल्मरने फेब्रुवारीमध्ये सूचीबद्ध झाल्यापासून गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे.

अलीकडेच कंपनीला बाजार भांडवलाच्या बाबतीत शीर्ष 50 भारतीय कंपन्यांमध्ये स्थान मिळाले. बाजार भांडवलाने 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्याने कंपनीला हे यश मिळाले. अदानी विल्मारच्या शेअरमध्ये अवघ्या दोन महिन्यांत 250 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.