Watch cheap cost movies in theaters : थिएटरमध्ये स्वस्तात सिनेमा पाहण्याची संधी! ‘ही’ बँक देतेय तिकिटांवर 50% सूट

MHLive24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी अनेक दिवसांपासून वाट पाहणारे प्रेक्षक चित्रपटगृह सुरू होताच आपले कुटुंबीय, मित्रपरिवार आणि जवळच्या मित्रमंडळींसह चित्रपट पाहण्यास येणार आहेत.(Watch cheap cost movies in theaters)

अशा परिस्थितीत, जर तुम्हीही चित्रपट पाहण्याचे शौकीन असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता तुम्ही चित्रपटाची तिकिटे स्वस्तात खरेदी करू शकता.

सध्या जागतिक महामारी कोरोनाच्या भीतीने लोक थिएटरमध्ये जाणे टाळत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सिनेमा हॉल, बँका, बुकिंग अॅप्स विविध ऑफर्स देत आहेत.

Advertisement

बरेच दिवस सिनेमागृह बंद होते

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पुन्हा रुळावर आले आहे. मात्र, आता आपल्या देशात महामारीचा धोका नाही असे अजिबात नाही, पण तरीही लोक या विषाणूसोबत जगायला शिकत आहेत.

सामान्य जीवन आणि देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारही सर्व आवश्यक पावले उचलत आहेत. याच अनुशंघाने आता सरकारने आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांसह सिनेमा हॉल सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

Advertisement

पण, चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाण्यासोबतच प्रेक्षकांनी कोविड नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे. बराच काळ बंद असलेला सिनेमा हॉल सुरू झाल्यानंतर प्रेक्षकही चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाकडे वळू लागले आहेत.

बँक जबरदस्त ऑफर देत आहे

देशातील 7वी सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ‘इंडियन बँक’ आपल्या ग्राहकांना उत्तम ऑफर देत आहे. चित्रपटाच्या तिकिटांच्या खरेदीवर बँकेकडून 50% ची जबरदस्त ऑफर दिली जात आहे.

Advertisement

तुम्ही इंडियन बँकेचे ग्राहक असल्यास, तुमचे क्रेडिट कार्ड वापरून BookMyShow द्वारे तिकीट बुक करण्यावर तुम्हाला 50% ची बंपर सूट मिळू शकते. यासाठी बँकेने काय अटी व शर्ती दिल्या आहेत ते जाणून घेऊया.

ऑफरचा लाभ घेण्यासाठी या अटी असतील

यासाठी तुमच्याकडे इंडियन बँकेचे रुपे क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे.
तुम्हाला ‘बुक माय शो’मध्ये जाऊन चित्रपटाची तिकिटे बुक करावी लागतील.
ऑफर अंतर्गत, तुम्ही एक कार्डवर महिन्यातून एकदाच लाभ घेऊ शकता.
तिकीट बुकिंगवर तुम्हाला 50 टक्के झटपट सूट मिळेल.
तथापि, तुम्ही एका वेळी कमाल रु.250 ची सूट घेऊ शकता.
ही ऑफर या वर्षाच्या शेवटपर्यंत म्हणजेच 31 डिसेंबर 2021 पर्यंत वैध आहे.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker