Discount offers on car : स्वतःची कार घ्यायचीय ? ‘ह्या’ कंपनीची सुरु आहे शानदार ‘नोव्हेंबर ऑफर’ , होईल 81500 रुपयांपर्यंतची बचत

MHLive24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- आजकाल प्रत्येकालाच स्वतःचे वाहन असावे असे वाटते. कोरोनामुळे याची गरज जास्त वाढली आहे. तुम्हाला स्वतःची कार खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण महिंद्र या महिन्यात आपल्या अनेक मॉडेल्सवर विविध सूट ऑफर आणि बेनिफिट्स देत आहे.(Discount offers on car)

या बेनिफिट्स मध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस, अॅक्सेसरीज आणि कॉर्पोरेट बेनिफिट्स यांचा समावेश आहे. जर तुम्ही महिंद्रा पॅसेंजर कार घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या बेनिफिट्सचा फायदा घेऊ शकता.

या बातमीत आम्ही तुम्हाला महिंद्राच्या नोव्हेंबर महिन्यातील ऑफरची माहिती देत आहोत. ही ऑफर महिंद्रा कारवर 30 नोव्हेंबरपर्यंत लागू आहे. जाणून घ्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट मिळत आहे.

Advertisement

महिंद्रा बोलेरो

महिंद्रा बोलेरोवर 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट आणि 10,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. नुकत्याच लाँच झालेल्या बोलेरो निओवर कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही. MVP (मल्टी-पर्पज व्हेइकल) बदल पहिले तर Marazzo तीन ट्रिममध्ये उपलब्ध आहे (M2, M4 Plus आणि M6 Plus).

या महिन्यात, Marazzo Rs 20,000 पर्यंत रोख सवलत, Rs 15,000 चे एक्सचेंज बोनस आणि Rs 5,200 च्या कॉर्पोरेट लाभासह उपलब्ध आहे.

Advertisement

महिंद्रा XUV300

Mahindra XUV300 कॉम्पॅक्ट SUV या महिन्यात 15,000 रुपयांपर्यंत रोख सवलत, 25,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सूटसह खरेदी केली जाऊ शकते. XUV300 वर 5,000 रुपयांपर्यंतच्या इतर ऑफर देखील उपलब्ध आहेत.

महिंद्रा अल्टुरस G4

Advertisement

Mahindra Alturas G4 हे महिंद्राचे प्रमुख मॉडेल असून या महिन्यात या कारवर सर्वाधिक सवलत उपलब्ध आहे. या कारवरील एक्सचेंज बोनस रु.50,000 पर्यंत आहे. याशिवाय, तुम्हाला Mahindra Alturas G4 वर 11,500 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आणि 20,000 रुपयांपर्यंतच्या इतर अतिरिक्त ऑफर देखील मिळतील.

KUV100 MXT आणि स्कॉर्पिओ

KUV100 MXT हे महिंद्राच्या लाइनअपमधील सर्वात परवडणारे मॉडेल आहे. KUV 38,055 रुपयांपर्यंत रोख सवलत, Rs 20,000 चा एक्सचेंज बोनस आणि Rs 3,000 पर्यंत कॉर्पोरेट सूट सह उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, स्कॉर्पिओवर 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

Advertisement

लक्षात ठेवा की ऑफर शहर आणि प्रकारानुसार बदलू शकतात. या सर्व ऑफर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत लागू आहेत आणि एक्स-शोरूम, दिल्ली आधारावर आहेत. Vमहिंद्राच्या थार आणि XUV700 वर कोणतीही ऑफर नाही.

महिंद्राची विक्री

महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची ऑक्टोबरमध्ये एकूण घाऊक विक्री वार्षिक 5 टक्क्यांनी घटून 41,908 युनिट्सवर आली आहे. कंपनीने ऑक्टोबर 2020 मध्ये एकूण 44,359 युनिट्सची विक्री केली होती. गेल्या महिन्यात कंपनीची देशांतर्गत बाजारपेठेत प्रवासी वाहनांची विक्री 20,130 युनिट्सवर होती, जी वर्षभरापूर्वीच्या 18,622 युनिट्सच्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढली आहे.

Advertisement

गेल्या महिन्यात देशांतर्गत व्यावसायिक वाहनांची विक्री ऑक्टोबर 2020 मध्ये 23,716 युनिट्सवरून 18,604 युनिट्सवर आली. ऑक्टोबर 2020 मधील 2,021 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात निर्यात 57 टक्क्यांनी वाढून 3,174 युनिट्सवर पोहोचली. XUV700 ला देखील जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker