दिवाळीत प्रवासाला जायचंय ? मिळेल 50 लाखांचा फायदा; कसा? वाचा…

MHLive24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- IRCTC च्या मदतीने ट्रेन आणि फ्लाइट तिकीट बुक केले जातात. लाखो लोक दररोज ट्रेन आणि फ्लाइटने प्रवास करतात. सणासुदीच्या काळात त्यात आणखी वाढ होते.(Trip on Diwali)

येत्या काही दिवसांत देशात अनेक मोठे सण येणार आहेत, त्यामुळे तुम्हीही IRCTC वरून तिकीट बुक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

IRCTC वर तिकीट बुक करून तुम्ही 50 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळवू शकता. आम्ही तुम्हाला या ऑफरबद्दल सर्व काही सांगणार आहोत.

Advertisement

IRCTC ने आणली खास ऑफर

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्हाला फ्लाइट तिकिट बुकिंगवर आकर्षक सूट मिळेल. जर तुम्ही IRCTC वरून तिकीट बुक केले तर तुम्हाला 50 लाख रुपयांचा विमा मोफत मिळेल.

IRCTC ने माहिती दिली

Advertisement

IRCTC ने ट्विट करून या ऑफरची माहिती दिली. आयआरसीटीसीने ट्विट केले की, ‘सणांच्या सीझनमध्ये काहीतरी खास हवे! #IRCTCAir वर प्रवासी त्यांचे फ्लाइट तिकीट सहज बुक करू शकतात. यावर किमान 50 रुपये सुविधा शुल्क लागेल. यासोबतच प्रवाशांना 50 लाख रुपयांचा विमाही मोफत मिळणार आहे. एलटीसी भाडे आणि विशेष संरक्षण भाडे यांसह बरेच फायदे असतील.

या ऑफर्स देखील उपलब्ध असतील

याशिवाय IRCTC ने या दिवाळीत आणखी एक खास ऑफर आणली आहे. तुमच्याकडे IRCTC SBI कार्ड प्रीमियर असल्यास, तुम्हाला बुकिंगवर 5% व्हॅल्यू बॅक सुविधेचा लाभ देखील मिळेल.

Advertisement

IRCTC वेबसाइटवर रेल्वे आणि हवाई तिकीट बुक करून प्रवासी 1.8 टक्के ट्रान्झॅक्शन फी देखील वाचवू शकतात. यासोबतच प्रवाशांना BookMyShow वर 500 रुपयांचे मूव्ही व्हाउचर आणि 1500 बोनस रिवॉर्ड पॉइंट्स देखील मिळतील.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker