Investment for retirement: रिटायरमेंट नंतर महिन्याला एक लाख रुपये पेन्शन घ्यायचीय? करावी लागेल ‘इतकी’ गुंतवणूक, जाणून घ्या कॅल्क्युलेशन

MHLive24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- अनेकांना वृद्धत्वाची चिंता असते. यासाठी अनेक लोक बचत आणि गुंतवणुकीचा पर्याय अवलंबतात. जर तुम्हाला तुमच्या कमाई करत असतानाच्या आयुष्यात बचत करायची असेल आणि सेवानिवृत्तीच्या टप्प्यात (निवृत्तीची वर्षे) निश्चित पेन्शन हवी असेल तर नॅशनल पेन्शन सिस्टम (राष्ट्रीय पेन्शन योजना: NPS) ही गुंतवणुकीची योजना सर्वोत्तम आहे.(Investment for retirement)

NPS पेन्शन कॅल्क्युलेटर वापरून, तुम्ही आजीवन सेवानिवृत्ती पेन्शन म्हणून रु. 50,000 किंवा रु. 1 लाख किंवा त्याहूनही अधिक मिळवण्यासाठी आता किती बचत करणे आवश्यक आहे ते जाणून घेऊयात.

काय करावे लागेल?: तुम्हाला फक्त NPS खाते उघडावे लागेल आणि तुमचे निवृत्तीचे वय होईपर्यंत नियमितपणे बचत त्यात करावी लागेल. जे सहसा तुम्ही 60 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला त्याचे रिटर्न देईल. मॅच्युरिटीवर (जेव्हा तुम्ही ६० वर्षांचे असता), तुम्ही एकूण रकमेपैकी कमाल 60 टक्के रक्कम काढू शकता आणि उर्वरित 40 टक्क्यांमधून पेन्शन दिली जाते.

Advertisement

वास्तविक, शिल्लक रकमेपैकी 40 टक्के रक्कम जीवन विमा कंपनीकडे सुपूर्द केली जाते, जिथून तुम्हाला आयुष्यभर पेन्शन किंवा वार्षिकी मिळणे सुरू होईल.

तथापि, NPS खाते उघडण्यापूर्वी, मासिक पेन्शनची इच्छित रक्कम वाचवण्यासाठी तुम्ही खरोखर चांगले नियोजन केले आहे का याची खात्री करा. निवृत्तीनंतर पेन्शनची इच्छित रक्कम मिळविण्यासाठी तुम्हाला दरमहा किती बचत करायची आहे याची गणना करण्यासाठी तुम्ही NPS कॅल्क्युलेटर (NPS ट्रस्टच्या वेबसाइटवर) वापरू शकता.

NPS पेन्शन कॅल्क्युलेटर तुम्हाला पेन्शन आणि एकरकमी रकमेबद्दल अंदाजे एक कल्पना देतो.त्या आधारे तुम्हाला विविध गणित आणि बचतीचे सूत्र बसवता येईल. जर तुम्हाला संपूर्ण रक्कम काढायची नसेल आणि संपूर्ण रकमेवर पेन्शन घ्यायची असेल, तर तुम्ही थोडी बचत करून जास्त पेन्शन मिळवण्याचे ध्येय ठेवू शकता.

Advertisement

मासिक पेन्शनची गणना करण्यासाठी NPS कॅल्क्युलेटर वापरताना, तुम्हाला खालीलपैकी काही गोष्टींची आवश्यकता असेल:

आता एक उदाहरण समजून घेऊयात – समजा 30 वर्षे वयाच्या व्यक्तीला (NPS मॅच्युरिटी वय 60 वर्षे) अंदाजे 10 टक्के वाढ अपेक्षित थर असेल, तर सहा टक्के अंदाजे वार्षिकी दर असण्याची शक्यता असते.

अशा परिस्थितीत वयाच्या 60 व्या वर्षी शून्य टक्के रक्कम काढल्यावर 1 लाख रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा 9000 रुपये गुंतवावे लागतील. वयाच्या 60 व्या वर्षी 40 टक्के पैसे काढल्यास, 1 लाख रुपये मासिक पेन्शन मिळविण्यासाठी प्रत्येक महिन्याला 22,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

Advertisement

तुमचे वय, बचतीची रक्कम, परताव्याचा दर आणि पैसे काढण्याचा दर यावर अवलंबून तुम्ही 50,000 रुपये किंवा रु. 1 लाख किंवा त्याहून अधिक आजीवन पेन्शन मिळवू शकता. NPS मध्ये गुंतवणुकीसह मिळणाऱ्या कर लाभांव्यतिरिक्त, NPS मधून बरेच काही मिळते.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker