OnePlus smartphone at cheap cost: OnePlusचा स्मार्ट फोन घ्यायची इच्छा आहे पण जास्तीचे पैसे नाहीत? ‘अशा’ पद्धतीने मिळेल अगदी स्वस्तात

MHLive24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- सध्या स्मार्टफोनचा जमाना आहे. यात अँड्रॉइडचा विचार केला तर सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन मेकर कंपन्यांमध्ये OnePlus चा प्रथम क्रमांक लागेल. वनप्लस स्मार्टफोनला जगभरात खूप पसंती आहे, भारतातही त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे.(OnePlus smartphone at cheap cost)

OnePlus ने या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये OnePlus 9R भारतात लॉन्च केला. आता कंपनीने या फोनवर मोठी सूट दिली आहे.ही सूट खूप कमी कालावधीसाठी असेल. तुम्ही याचा फायदा कसा घेऊ शकता ते पहा.

OnePlus 9R असा विकत घ्या तेही अगदी स्वस्त

Advertisement

OnePlus 9R कंपनीने 39,999 रुपयांना बाजारात लॉन्च केला होता. जर तुम्ही हा फोन Amazon वरून विकत घेतला तर तुम्हाला 3 हजार रुपयांचा कूपन डिस्काउंट मिळेल, ज्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 36,999 रुपये होईल. तसेच, जर तुम्ही ICICI बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला आणखी 3 हजार रुपयांची सूट मिळेल, ज्यामुळे तुम्हाला हा फोन 33,999 रुपयांना मिळू शकेल.

एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे

इतकंच नाही तर Amazon एक एक्सचेंज ऑफर देखील देत आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 17,900 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते, ज्यामुळे फोन आणखी स्वस्त होईल. तुम्हाला या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास, तुम्ही Rs 16,099 मध्ये OnePlus 9R खरेदी करू शकाल.

Advertisement

या फोनमध्ये काय खास आहे

OnePlus 9R च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन 6.55-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये तुम्हाला क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल ज्यामध्ये 48MP प्राथमिक कॅमेरा, 16MP वाइड-एंगल कॅमेरा, 5MP मॅक्रो कॅमेरा आणि 2MP मोनोक्रोम कॅमेरा समाविष्ट आहे.

सेल्फी घेण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. हा 5G स्मार्टफोन 256GB मेमरी, 4,500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो.

Advertisement

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker