स्वप्नातील कार घायचीये? ‘ह्या’ शानदार कार्स वर मिळतिये जबरदस्त सूट; जाणून घ्या…

MHLive24 टीम, 14 ऑगस्ट 2021 :-  जर तुम्ही या महिन्यात नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी जाणून घ्या की, देशातील आघाडीची वाहन निर्माता महिंद्रा आपल्या निवडक कारवर 2.55 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. कंपनीने दिलेली सूट महिंद्रा स्कॉर्पियो, एक्सयूव्ही 500, एक्सयूव्ही 300 आणि बोलेरोसारख्या कारवर लागू आहे. परंतु ऑफर केलेल्या सवलतीत कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट डिस्काउंटसह इतर फायदे आहेत.

महिंद्रा एक्सयूव्ही 500: मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी महिंद्राच्या या एक्सयूव्ही 500 च्या खरेदीवर 1.79 लाख रुपयांची रोख सवलत देत आहे. ज्यात 50,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 6500 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट आणि 20,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज दिल्या जात आहेत.

महिंद्रा स्कॉर्पियो: महिंद्रा स्कॉर्पियो ही त्याच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. ज्यावर कंपनीला 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस, 4500 रुपयांची कॉर्पोरेट सवलत आणि 17 हजार रुपयांपर्यंत अॅक्सेसरीज दिली जात आहे.

Advertisement

महिंद्रा मराझो: कंपनी महिंद्रा मराझोवर 20,000 रुपयांची रोख सवलत, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5,200 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.

महिंद्रा XUV 300: महिंद्रा XUV 300 वर 10,480 रुपयांची रोख सवलत देत आहे. ज्यासह 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 4,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत देखील दिली जात आहे. याशिवाय 5000 रुपयांच्या अॅक्सेसरीजचा लाभ देखील दिला जाईल.

महिंद्रा बोलेरो: महिंद्रा बोलेरो भारताच्या ग्रामीण भागात खूप पसंत केली जाते. कंपनी या SUV वर 3500 रुपयांची रोख सवलत देत आहे. ज्यासह 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपये कॉर्पोरेट सवलत दिली जात आहे. या सर्व सवलतींनंतर, कंपनी या एसयूव्हीवर चौथ्या वर्षाची वॉरंटी देखील देत आहे.

Advertisement

महत्वाची माहिती: महिंद्रा कारवर नमूद केलेली सूट मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कंपनीने देऊ केलेली सूट शहरानुसार बदलू शकते. जर तुम्हालाही या सवलतींसह महिंद्रा कार खरेदी करायची असेल तर त्याआधी तुम्ही तुमच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधून किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या संपर्क फॉर्मवर संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker