Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

सोने खरेदी करायचेय ? आधी वाचा सरकारचा ‘हा’ नियम; देशभरातील ज्वेलर्सने घेतलाय ‘हा’ निर्णय

Mhlive24 टीम, 07 जानेवारी 2021:कोरोना महामारीची सुरुवात झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली. किरकोळ गुंतवणूकदारही याकडे आकर्षित होत असून मोठ्या प्रमाणात खरेदीही केली जात आहे.

Advertisement

वित्त मंत्रालयाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर आता सोन्या, चांदी, हिरा, प्लॅटिनम, स्टोन हे कॅश खरेदी करायचे असेल तर स्वत:ची ओळख पुरावा द्यावा लागेल. म्हणजे, आधार आणि पॅनशिवाय आता ज्वेलर्स आपल्याला खरेदी करून देणार नाहीत.

Advertisement

येणाऱ्या अर्थसंकल्पात रोखीने दागिने खरेदी करण्यासाठी केवायसी आवश्यक केले जाईल अशी भीती ज्वेलर्स लोकांना आहे. 28 डिसेंबर रोजी वित्त मंत्रालयाने पीएमएलएच्या (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट) कार्यक्षेत्रात सोन्याचा व्यापार आणण्याची अधिसूचना जारी केली.

Advertisement

आता अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) कोणत्याही कागदपत्रांशिवाय केलेल्या सोन्याच्या व्यापाराची चौकशी करण्याचा अधिकार आहे. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार आता दहा लाखाहून अधिक व्यवहारांचा तपशील आता ज्वेलर्सला आपल्याकडे ठेवावे लागणार आहे. या प्रकरणात पकडल्यास 3-7 वर्षांच्या शिक्षेचीही तरतूद आहे.

Advertisement

आता रोख खरेदीवर केवायसीची मागणी

सरकारच्या या निर्णयानंतर ज्वेलर्स आता 2 लाखांपर्यंतच्या रोख व्यवहारासाठी आधार आणि पॅनची मागणी करत आहेत. सध्याच्या नियमानुसार सोन्याव्यतिरिक्त कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी केवायसी आवश्यक आहे.

Advertisement

2 लाखांपर्यंत सोनं खरेदी करण्यासाठी केवायसीची आवश्यकता नाही, पण 28 डिसेंबरच्या आदेशानंतर आता दोन लाखांपेक्षा कमी किंमतीच्या खरेदीसाठी ज्वेलर्स पॅन किंवा आधारची मागणी करत आहेत. त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या विवादांपासून स्वत: चा बचाव करायचा आहे.

Advertisement

सरकार सोन्याबाबत स्पेशल पॉलिसी आणू शकते

एका प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सोन्यासह इतर मौल्यवान धातूंवर सर्वसमावेशक धोरण आणण्याचा सरकार विचार करीत आहे. महागड्या धातूंमध्ये केलेली गुंतवणूक ही एक मालमत्ता म्हणून पहावी अशी सरकारची तयारी आहे. सध्या हा ‘undisclosed treasure’ मानला जातो.

Advertisement

भारत दरवर्षी 850 टन सोन्याचा वापर करतो. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचा असा विश्वास आहे की सोने आणि चांदी रोख खरेदीसाठी अर्थसंकल्पात एक नियम जाहीर केला जाईल. म्हणूनच आम्ही सध्या त्याची रंगीत तालीम करत आहोत.

Advertisement

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर

Advertisement
Advertisement
li