घर खरेदी करायचंय ? हीच आहे योग्य संधी! सध्या आहेत ‘इतक्या’ साऱ्या फॅसिलिटी, वाचा अन फायदा घ्या

MHLive24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- आपलं एक स्वत:च्या मालकीचं घर असावं असं स्वप्न अनेकजण पाहतात. आपलं आताचं कुटुंब आणि पुढच्या अनेक पिढ्या याच घरात राहू शकतील अशी इच्छाही घर घेणाऱ्याच्या मनात असते. तुम्हीही घर घेऊ इच्छित असाल तर सध्याची परिस्थिती त्याला खूपच अनुकूल आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाने अर्थव्यवस्था कोलमडली आहे. एकही असं क्षेत्र नाही जे कोरोनाच्या तडाख्यातून सुटलं असेल. यात बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्राचाही समावेश आहे. त्यामुळेच घर खरेदीलाही घरघर लागलेली दिसली. मात्र, ‘संकटात संधी असते’ या वाक्याप्रमाणे काही लोक घर खरेदीसाठी हाच काळ चांगला मानत आहेत.

रेरा कायदा :- सरकारने 2016 मध्ये रेरा कायदा लागू केला, ज्यामध्ये बिल्डरांना निर्दिष्ट कालावधीत ग्राहकांना घरे देण्याचे बंधन आहे. हा कायदा ग्राहकांच्या भांडवलावर संरक्षण देतो जेणेकरून बिल्डर फसवणूक करू शकत नाही. पैसे घेऊन पळून जाऊ शकत नाही. प्रकल्पात हलगर्जीपणा आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. जरी सर्व मालमत्ता अद्याप RERA मध्ये नोंदणीकृत नसल्या तरी, बहुतेक त्याच्या कार्यक्षेत्रात आहेत. हे लक्षात घेऊन ग्राहक रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवू शकतो.

Advertisement

अफोर्डेबल हाउसिंग :- मध्यमवर्गातील नागरिकांना परवडेल अशा किमतींत घरं उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ॲफोर्डेबल हाउसिंग योजना लागू केली. लोकांना या योजनेअंतर्गत घरं घेता यावीत यासाठी सरकार प्रयत्नशील असतं. या योजनेतून बँकेतून घेतलेल्या कर्जावर करात सूट देणं, बिल्डर आणि डेव्हलपरना करात सूट देणं अशा गोष्टी केल्या जातात. याचाही तुम्हाला फायदा होऊ शकतो.

रेडी टू मूव्ह अपार्टमेंट :- सध्या फ्लॅट बूक करून तो काही वर्षांनी तयार झाल्यावर रहायला जायचं हे ग्राहकांना पसंत नाही. त्यामुळे ते बांधून तयार असलेलं घर विकत घ्यायला प्राधान्य देतात. त्यामुळे थोडे अधिक पैसे देऊन ग्राहक रेडी टू मूव्ह घरं खरेदी करतात. अशा तयार असलेल्या घरांवर बिल्डर अनेक सवलती देत आहेत त्यामुळे तुम्हीही अशा तयार घरात रहायला जाऊ शकता.

गृहकर्जाचे कमी व्याज :- गृहकर्जावरील व्याजदर इतके कमी झाले आहेत असे कधीच दिसले नाही. बँकासुद्धा आता गृहकर्ज कंपन्यांपेक्षा कमी व्याजदराने गृहकर्ज देत आहेत. यामुळे बँका आणि फायनान्स कंपन्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे, ज्याचा ग्राहकांना फायदा होत आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI ने गृह कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. घरांची मागणी वाढवण्यासाठी सरकारने अलीकडेच भाडेकरू कायद्यात बदल केले आहेत.

Advertisement

मुद्रांक शुल्कात कपात :- देशातील अनेक राज्य सरकारांनी घरांची विक्री वाढवण्यासाठी मुद्रांक शुल्कात सूट दिली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारांनी परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू केले आहे. लोकांना सहजपणे घरे मिळावीत यासाठी नियम शिथिल करण्यात आले आहेत.

गृहनिर्माण क्षेत्राला गती देण्यासाठी बंगाल सरकारने मुद्रांक शुल्क आणि सर्किल दर कमी केले आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकनेही या दिशेने पावले उचलली आहेत. सर्कल रेट पूर्वी कमी करण्यात आला आहे आणि कर सूट देखील दिली जात आहे.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker