स्वप्नातलं घर खरेदी कायचंय पण बजेट नाही? ‘ही’ बँक देतेय स्वस्तात घर खरेदी करायची संधी

MHLive24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु बऱ्याचदा त्यासाठी लागणार खर्च हा प्रत्येकालाच पेलवणारा नसतो. त्यामुळे अनेकांचे स्वप्न हे स्वप्नच राहते. अशा लोकांसाठी सरकारी बँक पीएनबी एक खास संधी देत आहे. पंजाब नॅशनल बँक तुम्हाला 12 ऑगस्ट रोजी स्वस्त घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी देत आहे.

पंजाब नॅशनल बँक मेगा ई-ऑक्शन आयोजित करणार आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वस्त घरासाठी बोली लावू शकता. या लिलावात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आणि शेतीसह सर्व प्रकारच्या मालमत्तेचा लिलाव बँकेद्वारे केला जाणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही मालमत्तेसाठी बोली लावू शकता.

थकबाकीची रक्कम परत मिळवण्यासाठी बँक गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव करणार आहे. लिलावाची संपूर्ण माहिती भारतीय बँका ऑक्शन मॉर्गेज प्रॉपर्टीज इंफॉर्मेशन अर्थात IBAPI वर उपलब्ध आहे. त्याची स्थापना इंडियन बँक्स असोसिएशनने केली. पीएनबीच्या या मेगा लिलावामध्ये 14117 निवासी मालमत्ता आणि 3175 व्यावसायिक मालमत्ता लिलावासाठी आहेत. याशिवाय इंजस्ट्रीयल प्रॉपर्टीज 1574, एग्रीकल्चर प्रॉपर्टीज 105 आहेत. ही प्रॉपर्टीज डीफॉल्टच्या सूचीमध्ये आहेत.

Advertisement

लिलावामध्ये ‘असा’ घ्या भाग :- ई-लिलाव नोटीसमध्ये दिलेल्या संबंधित मालमत्तेसाठी ईएमडी सादर करावा लागेल. ‘केवायसी कागदपत्रे’ संबंधित बँक शाखेत दाखवावी लागतात. लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडे डिजिटल स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. नसल्यास ई-लिलावकर्ता किंवा इतर कोणत्याही अधिकृत एजन्सीला यासाठी संपर्क साधता येईल.

ई-लिलावकर्ता संबंधित बँक शाखेत ईएमडी जमा केल्यानंतर आणि केवायसी कागदपत्रे दाखवल्यानंतर बिडरच्या ईमेल आयडीवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवेल. लिलावाच्या नियमांनुसार, ई-लिलावाच्या दिवशी वेळेवर लॉगिन करून बोली लावता येते.

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker