Aadhaar card संदर्भात फसवणूक टाळायची आहे ? मग ‘हा’ क्रमांक करा अपडेट,नाहीतर होईल नुकसान!

MHLive24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- सध्या इंटरनेटशिवाय जगणे फारच अवघड झाले आहे. इंटरनेटशिवाय आजकाल कसलेच काम होत नाही. लॅपटॉप किंवा मोबाईलवर प्रत्येकजण इंटरनेट वापरतो परंतु, वाढत्या तंत्रज्ञानाचा समांतर धोका देखील मोठा आहे.(Aadhaar card)

कधी इंटरनेटद्वारे लॅपटॉप वरून डेटा चोरीला जातो, तर कधी मोबाइल हॅक केला जातो. याच तंत्रज्ञानाने बऱ्याचदा आधार ची माहिती चोरीला गेल्याचेही समोर आले आहे. यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. आता यूआयडीएआयने स्वतःला या फसवणुकीपासून वाचवण्यासाठी महत्वाचा सल्ला दिला आहे.

यूआयडीएआयने लोकांना सावध केले आहे की आधार ऑनलाइन सेवेसाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे आवश्यक असल्याने, आधारमध्ये जो काही क्रमांक आहे तो अपडेट केला पाहिजे. जर मोबाईल हरवल्यावर नंबर बदलला तर तो तात्काळ आधारमध्ये अपडेट करावा.

Advertisement

जर आधारमध्ये कोणताही फोन नंबर दिला नाही, तर जवळच्या आधार केंद्रात जाऊन त्वरित नोंदणी करावी. असे केल्याने आधार संदर्भात फसवणूक होणार नाही असे त्यांनी म्हटलं आहे.

मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरिफाई कसा कराल?

UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला uidai.gov.in वर भेट द्या किंवा https://resident.uidai.gov.in/verify-email-mobile वर क्लिक करा.
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर गेल्यानंतर ‘माझे आधार’ पर्यायावर क्लिक करा
आता आधार सेवा टॅबवर जा आणि ईमेल/मोबाईल नंबर सत्यापित करा निवडा
तुमचा 12 अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक इथे टाका. संपर्क तपशीलात, मोबाईल नंबर आणि ईमेल इत्यादी तपशील द्या.
आता कॅप्चा पडताळणी पूर्ण करा
आता ओटीपी पाठवा वर क्लिक करा

Advertisement

मोबाईल क्रमांकाची आधारमध्ये नोंदणी कशी कराल?

तुमच्या जवळच्या आधार केंद्राला भेट द्या आणि आधार कार्ड करेक्शन फॉर्म भरा.
आधारमध्ये अपडेट होण्यासाठी मोबाईल नंबर टाका.
करेक्शन फॉर्म सबमिट करा आणि प्रमाणीकरणासाठी तुमचा बायोमेट्रिक डेटा द्या.
आधार केंद्राचा कर्मचारी तुम्हाला एक पावती देईल.
पावतीवर अपडेट रिक्वेस्ट नंबर (यूआरएन) नमूद केला आहे.
यूआरएनचा वापर करून आधार अपडेट स्थिती तपासली जाऊ शकते.
आधार मध्ये मोबाईल नंबर अपडेट केल्यानंतर (आधार सोबत मोबाईल नंबर अपडेट करा), तुम्हाला दुसरे आधार कार्ड घेण्याची गरज नाही.
तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी नोंदणीकृत होताच तुमच्या नंबरवर आधार ओटीपी येणे सुरू होईल.
तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही UADAI च्या टोल-फ्री नंबर 1947 वर कॉल करून आधारची अद्ययावत स्थिती देखील तपासू शकता

 

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

 

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker