पासपोर्ट पाहिजे? आता दूर जाण्याची गरज नाही, जवळच्या पोस्टात आली ‘ही’ सेवा

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- कोणत्याही व्यक्तीसाठी देशाबाहेर जाण्यासाठी पासपोर्ट असणे खूप महत्वाचे आहे. यासाठी आता पासपोर्ट सेवा केंद्र दूर असण्याची फारशी काळजी करण्याची गरज नाही कारण आता तुम्ही जवळच्या टपाल कार्यालयातदेखील नोंदणी करून पासपोर्टसाठी अर्ज करू शकता.

यासाठी ज्यांना पासपोर्ट घ्यायचा आहे, अशा लोकांना त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएसएस) काउंटरवर जावे लागेल. इंडिया पोस्टने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. तथापि, सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही.

परराष्ट्र मंत्रालय (एमईए) देशाच्या विविध भागात पासपोर्ट सेवा केंद्रांच्या माध्यमातून पासपोर्ट सेवा चालविते. नुकतीच इंडिया पोस्टने निवृत्तीवेतनधारक आणि इतर ज्येष्ठ नागरिकांसाठी लाईफ सर्टिफिकेट सर्विस आणि इनकम टैक्स रिटर्न सर्विस सुरू केली आहे.

Advertisement

मूळ कागदपत्रांसह केंद्रात जावे लागेल :- पासपोर्ट इंडिया वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र ही त्यांची एक्सेंटेंड आर्म आहेत जिथे पासपोर्ट देण्यासाठी सेवा प्रदान केली जाते. या केंद्रांवर पासपोर्ट जारी करणे आणि पुन्हा जारी करण्याची सेवा दिली जाते.

ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जदारांनी अर्जाची प्रिंट पावती व मूळ कागदपत्रांसह पासपोर्ट सेवा केंद्रात हजर असणे अनिवार्य आहे. ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे आणि पासपोर्टसाठी अर्ज केले आहेत ते जवळच्या टपाल कार्यालयात असणाऱ्या पासपोर्ट सेवा केंद्रात एप्लीकेशन प्रिंट रिसीट आणि मूळ कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

स्मार्टफोनमध्ये आरोग्य सेतु ऍप असणे आवश्यक आहे :- कोरोना महामारीमुळे, पासपोर्ट अर्जदारांनी त्याशी संबंधित प्रोटोकॉलचे अनुसरण करणे आवश्यक आहे. पासपोर्ट सेवेच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार अर्जदारांना मास्क घालणं, सॅनिटायझर्स आणि सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. याशिवाय आरोग्य सेतु अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड आणि इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker