Mhlive24.com
Maharashtra Live News Updates in Marathi

ड्रायव्हिंग लायसेन्स अपडेट करायचेय? त्यासाठी करावे लागेल असे काही

Mhlive24 टीम, 16 जानेवारी 2021:सध्या कोरोना संसर्ग सगळे काही ठप्प झाले होते. लोकांची महत्वाची अशी काही कामे हि लांबणीवर पडली होती. परंतु आता लस आल्यामुळे आणि कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्यामुळे पुन्हा जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

Advertisement

महत्वाची ऑफिस आणि व्यवहार सुद्धा पुन्हा चालू झाले आहे. अशातच जर तुम्हाला वाहन परवाना म्हणजेच ड्रायविंग लायसन्स अपडेट करायचे असल्यास ते देखील तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात.

Advertisement

वाहन परवाना काढण्यासाठी आता तुम्हाला आरटीओ ऑफिस च्या चकरा मारण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुमचे लायसन्स अपडेट करू शकता.

Advertisement

कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आणि सोशल डिस्टन्स चे पालन व्हावे म्हणून हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या साठी तुम्हाला एक फॉर्म डाउनलोड करून भरावा लागणार आहे. मग तो स्कॅन करून अपलोड करावा लागणार आहे.

Advertisement

वाहन परवाना रिन्यू करण्यासाठी काय आहे पद्धत ?

  • ऑनलाईन ड्रायव्हिंग परवाना रिन्यू करण्यासाठी सगळ्यात आधी भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर https://parivahan.gov.in/parivahan/ जा.
  • इथे गेल्यावर डावीकडील ऑनलाईन पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर ‘सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस’ वर क्लिक करा आणि पुढील दिलेली माहिती भरा.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती भरून कागदपत्रंही जोडा.
  • अर्ज आणि कागदपत्रं भरल्यानंतल ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होते.
  • यानंतर काही दिवसांत ड्रायव्हिंग परवाना तुम्ही दिलेल्या पत्त्यावर येईल. (driving license renew online will be done in just 5 steps)
📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683 हा आमचा नंबर
Advertisement