UIDAI ने मुलांचे आधार बनविण्याचा मोठा नियम बदलला; तुम्हीही जाणून घ्या

MHLive24 टीम, 28 जुलै 2021 :- भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने मुलांचा आधार मिळण्याच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. युआयडीएआयने मंगळवारी सांगितले की मुलाचे जन्म प्रमाणपत्र किंवा हॉस्पिटल डिस्चार्ज स्लिप आणि पालकांपैकी कोणत्याही एकाच्या आधार कार्डद्वारे लहान मुलांच्या आधार साठी अर्ज करु शकतात. बाल आधार हे आधार कार्डचे निळे निळ्या रंगाचे व्हेरिएंट आहे.

जे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दिले जाते. आता पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बायोमेट्रिक तपशीलांची आवश्यकता नाही. 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बायोमेट्रिकची आवश्यकता (फिंगरप्रिंट आणि नेत्र स्कॅन) समाप्त केली गेली आहे. एकदा मूल पाच वर्षांचे झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य आहे.

आधारसाठी आवश्यक कागदपत्रे :- ओळखपत्र म्हणून वापरल्या जाणार्‍या कागदपत्रांमध्ये पासपोर्ट, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, नरेगा जॉब कार्ड इत्यादींचा समावेश आहे. पत्त्याचा पुरावा म्हणून वापरल्या जाणार्‍या कागदपत्रांमध्ये पासपोर्ट, बँक स्टेटमेंट / पासबुक, पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट, रेशन कार्ड इत्यादींचा समावेश आहे.

Advertisement

मुलाचे बाल आधार कसे बनवायचे ? :- यूआयडीएआय वेबसाइटला भेट द्या आणि आधार कार्ड नोंदणीचा पर्याय निवडा. मुलाचे नाव आणि बायोमेट्रिक माहिती आदी आवश्यक माहिती भरा. त्यानंतर निवासी पत्ता, परिसर, राज्य यासारखी डेमोग्राफिक डिटेल सबमिट करा. आधार कार्डासाठी रजिस्ट्रेशन निर्धारित करण्यासाठी ‘अपॉईंटमेंट’ पर्यायावर क्लिक करा. नजीकचे नोंदणी केंद्र निवडा, आपले अपॉइंटमेंट ठरवा आणि तेथे ठरलेल्या तारखेला जा.

पुढील प्रक्रिया जाणून घ्या :- एनरोलमेंट सेंटरवर ओळख पुरावा (पीओआय), पत्त्याचा पुरावा (पीओए), नात्याचा पुरावा (पीओआर) आणि जन्मतारीख (डीओबी) अशी आवश्यक कागदपत्रे घेऊन जा. सर्व कागदपत्रांची तपासणी करुन घ्या. मुलाचे वय पाच वर्षांपेक्षा जास्त असल्यास बायोमेट्रिक डेटा घेतला जाईल. पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना बायोमेट्रिक डेटाची आवश्यकता नाही, केवळ डेमोग्राफिक डेटा आणि चेहर्यावरील ओळख आवश्यक असते.

पोचपावती क्रमांक मिळेल :- यानंतर पालकांना त्यांच्या अर्जाची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी एक पावती क्रमांक (पोच संख्या) मिळेल. त्यानंतर 60 दिवसांच्या आत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस येईल. बाळ आधार कार्ड 90 दिवसांच्या आत आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे.

Advertisement

घरी बसून मोबाईल नंबर अपडेट करा :- यूआयडीएआयने अलीकडेच आणखी एक सेवा सुरू केली आहे. इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) सह भागीदारी केली आहे. आयपीपीबीनुसार, ते ग्राहकांना त्यांच्या घरी पोस्टमनच्या माध्यमातून आधारमध्ये नोंदणीकृत फोन नंबर अपडेट करण्याची सुविधा देतील.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker