लिफ्ट कोसळल्याप्रकरणात दोघांना अटक

MHLive24 टीम, 25 जुलै 2021 :- वरळी लिफ्ट दुर्घटना प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्यावर गुन्हा नोंदवून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबईतील वरळी भागात निर्माणाधीन बिल्डींगची लिफ्ट कोसळून पाच मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

ही आहेत मृतांची नावे :- वरळीतील हनुमान गल्लीत बीडीडी चाळ नंबर 118, 119 च्या समोर असलेल्या ललित अंबिका या निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून चौघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या एकाने उपचारादरम्यान प्राण गमावले.

मृतांमध्ये अविनाश दास (35 वर्षे), भारत मंडल (27 वर्षे), चिन्मय मंडल (33 वर्षे) आणि एका 45 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.

Advertisement

कंत्राटदार आणि सुपरवायझरवर गुन्हा :- एनएम जोशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्यावर गुन्हा नोंदवून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटकेतील आरोपींनी कामगारांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट यासारख्या सुविधा पुरवल्या नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

शनिवारी संध्याकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत मदतकार्य केले होते. जखमींना तातडीने केईएम रुग्णालय आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आदित्यंची घटनास्थळाला भेट :-  वरळीचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. ओव्हरलोडमुळे ही लिफ्ट दुर्घटना घडल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती.

Advertisement
  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker