बारा किलोमीटर गुंडाचा सिनेस्टाईल पाठलाग

MHLive24 टीम, 26 जुलै 2021 :- व्यावसायिक वैमन्यस्यातून झालेल्या उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलच्या मालकाची हत्या केलेल्या दोन फरार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

गुन्हे शोध पथकाने लातूर येथे सुमारे १० ते १२ किलोमीटर सिनेस्टाईल थरारकपणे पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. धक्कादायक बाब म्हणजे खून करणारा अल्पवयीन असून दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.

ही आहेत आरोपींची नावे :- पोलिस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी हडपसर परिसरातील १७ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलांसह त्यांचा साथीदार नीलेश मधुकर आरते ( वय २३, रा. तुकाईदर्शन, हडपसर, पुणे ) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Advertisement

तर यापूर्वी बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय ५६ ), निखील बाळासाहेब खेडेकर ( वय २४, दोघे रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता हेवेली ), निखील मंगेश चौधरी ( वय २० ), गणेश मधुकर माने ( वय २०, दोघे रा. कोरेगावमूळ ता हवेली ), प्रथमेश राजेंद्र कोलते ( वय २३, रा उरुळी कांचन, ता. हवेली ), अक्षय अविनाश दाभाडे ( वय २७, रा.सोरतापवाडी, ता हवेली ), करण विजय खडसे ( वय २१, रा. माकड वस्ती सहजपुर ता दौंड ) व सौरभ कैलास चौधरी ( वय २१, रा खेडेकर मळा ता हवेली ) यांना अटक करण्यात आली आहे.

हाॅटेल आकाशच्या मालकाचा सहभाग :- उरुळी कांचन येथील प्रसिद्धा गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे यांची अल्पवयीन मुलगा व निलेश आरते या दोघांनी मिळून हत्या केली. आखाडे यांच्यावर उपचार सुरू असताना २० जुलैला त्यांचा मृत्यू झाला.

अशोका हॉटेलचे मालक जयवंत खेडेकर यांचा भाचा सौरभ उर्फ चिम्या याचा सहभाग असल्याची माहिती मिळाल्याने त्याला ताब्यात घेऊन तपास केला. त्याने हॉटेलचा व्यवसाय वाढवण्याचे उद्देशाने खून घडवून आणल्याचे निष्पन्न झाले.

Advertisement

अल्पवयीन मुलावर दरोड्याचे गुन्हे :- या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सलग सात दिवस सतत तपास करून दोघांचा पुणे, अहमदनगर, बार्शी, सोलापूर, लातुर, उस्मानाबाद जिल्हयात शोध घेत ते दोघे लातूर येथील गांधी चौकात असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांची चाहूल लागताच दोघ दुचाकीवरून पळून गेले. त्यानंतर सुमारे १० ते १२ किलोमीटर थरारकपणे पाठलाग करून त्यांना पकडण्यात यश आले. यांतील अल्पवयीन मुलावर दरोड्याची तयारी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, तर आरते हा पुणे शहर व पुणे जिल्हा हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker