TVS in Electric Vehicle Segment : पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

अशा परिस्थितीत अनेक मोठे दिग्गज आहेत जे केवळ इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्यात गुंतले आहेत. अशातच ev सेक्टर मधून एक मोठी अपडेट येत आहे.

ही बातमी टीव्हीएस कंपनी बाबत आहे. वास्तविक उत्पादनासाठी पीएलआय सारख्या सरकारी योजनांचा लाभ घेऊन इलेक्ट्रिक वाहन विभागामध्ये ‘वर्चस्व कायम ठेवण्याचे’ TVS मोटर कंपनीचे उद्दिष्ट आहे.

TVS च्या 2021-22 आर्थिक वर्षाच्या अहवालानुसार, कंपनीने इलेक्ट्रिक वाहन श्रेणीमध्ये आपले स्थान वाढवण्याची जोरदार योजना आखली आहे. दुचाकी निर्मात्या कंपनीने सांगितले की, “कंपनी सरकारच्या PLI आणि FAME-II उपक्रमांचा पुरेपूर फायदा घेईल आणि धोरणात्मकदृष्ट्या या विभागात वर्चस्व कायम ठेवेल”.

टीव्हीएस मोटरने सांगितले की, इलेक्ट्रिक वाहन उद्योग वेगाने वाढणार आहे आणि कंपनीच्या या विभागासाठी मोठ्या योजना आहेत. कंपनीने म्हटले आहे की, नवीन उत्पादनांची लाँचिंग आणि आर्थिक क्रियाकलाप पुन्हा एकदा वेगवान झाल्याने विक्री वाढीच्या बाबतीत उद्योगाला मागे टाकण्याची अपेक्षा आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की TVS मोटरने गेल्या आर्थिक वर्षात 10,000 हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली आहे. अशाप्रकारे भविष्यात टीव्हीएस कंपनीकडून विविध प्रकारची वाहने लाँच केली जाऊन टॉप कंपण्याना एक स्पर्धा निर्माण होऊ शकते.