इंटरनेट आणि मोबाईलशिवाय ‘अशा’ प्रकारे करा पैसे ट्रान्सफर, जाणून घ्या प्रक्रिया

MHLive24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :-  स्मार्टफोन आणि इंटरनेटपासून दूर असलेल्या ग्राहकांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर NEFTआणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटची अर्थात RTGS ऑफलाइन सेवा खूप फायदेशीर आहे. ऑनलाईन बँकिंग तंत्रज्ञानात अस्वस्थ असलेले खातेदार NEFT आणि RTGS ची ऑफलाइन सेवा करून एका क्षणात कोणालाही पैसे पाठवू शकतात.

याशिवाय, जे लोक फसवणुकीच्या शक्यतेमुळे ऑनलाईन फंड ट्रांसफर करण्यास संकोच करतात, ते ट्रॅन्जेक्शनसाठी NEFT/RTGS ही सेवा वापरतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्यावी लागते ज्यामध्ये खाते आहे. मात्र, तुम्ही ज्या शाखेत जाणार आहात ती शाखा ही सेवा देते की नाही हे आधी पहा. तुम्हाला याविषयी अगोदरच शोधावे लागेल अन्यथा तुमचा वेळ आणि शक्ती दोन्ही वाया जाईल.

तुम्हाला शाखेत जाऊन NEFT / RTGS फंड ट्रांसफर रिक्वेस्ट फॉर्म भरावा लागेल. तुम्हाला नाव आणि खाते क्रमांक, हस्तांतरित करायची रक्कम, लाभार्थी बँकेचे नाव आणि आयएफएससी कोड आदी प्रविष्ट करावे लागेल.

Advertisement

पुढे, तुम्हाला लाभार्थी (ज्यांना तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत) नाव आणि खाते क्रमांक, हस्तांतरित करायची रक्कम, लाभार्थी बँकेचे नाव आणि लाभार्थीच्या बँक शाखेचा आयएफएससी कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. यानंतर काही शुल्क भरून तुमचा फंड ट्रांसफर केला जाईल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup

 

Advertisement

Mhlive24

Maharashtra Live News Updates In Marathi, Latest Politics, Crime, Entertainment, Sports, Money And Lifestyle News In Marathi

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker